शिक्षकांच्या समर्पणामुळेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेमध्ये अव्वल - गीतांजली शेळके

चंद्रकांत कदम | पारनेर

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी शाळेसाठी केलेले प्रयत्न, त्याग आणि समर्पण यामुळेच अत्याधुनिक युगात खाजगी शाळांच्या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा टिकून आहेत. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेमध्ये अव्वल असल्याचे प्रतिपादन जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांनी केले. 


       पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मल्हारी रेपाळे, सतीश भालेकर, जयप्रकाश साठे या शिक्षकांची शासन नियमानुसार इतर ठिकाणी बदली झाल्याबद्दल पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने निरोप व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश काळे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके बोलताना म्हणाल्या की, आपल्या शाळेतून बदली होऊन जात असलेल्या मल्हारी रेपाळे, सतीश भालेकर, जयप्रकाश साठे या तीनही शिक्षकांसोबत शाळेच्या इतर शिक्षकांनी केलेल्या अथक प्रयत्न, त्याग व समर्पण यामुळे आपल्या गावची शाळा ही गुणवत्तेबद्दल जिल्ह्यात नेहमीच अव्वल राहिली. या शाळेमध्ये तालुक्याभरातून विद्यार्थी येत असल्याने शाळेसोबत गाव देखील नावारूपाला आले आहे. या शिक्षकांची बदली झाल्यानंतर नवीन आलेल्या शिक्षकांनी देखील याच पद्धतीने गुणवत्तेचा अलग वाढता ठेवावा अशी अपेक्षा गीतांजली शेळके यांनी व्यक्त केली. 


          यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप अडसरे, केंद्रप्रमुख नारायण बाचकर, माजी प्राचार्य साहेबराव थोरात, माजी सरपंच भास्कर शेळके, कैलास घेमूड, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, माजी उपसरपंच संदीप काळे, मेजर प्रकाश वाढवणे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे, सचिन शेळके, निलेश शेळके, माऊली थोरात, विनोद कदम, देवजी कदम, शिक्षक विजय पठारे, मुख्याध्यापक पांडुरंग पवार, प्रशांत दिघे, नंदकुमार औटी, एकनाथ गुंजाळ, शिक्षिका शारदा तांबे, मंगला हराळ, सिंधू वाघ, प्रियांका हजारे, अर्चना नाईक, अनिता पावडे, सोनाली मोरे, तळेकर मॅडम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



विद्यार्थ्यांच्या मनोगताने शिक्षकांसह ग्रामस्थ भारावले 

       शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. शिक्षकांच्या सानिध्यामध्ये जडणघडणीत आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांनी मांडले. अनेकांनी शिक्षकांवर कविता केल्या. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या तर मनोगतांनी उपस्थित शिक्षकांसह नागरिकांचेही मन भारावले.

Post a Comment

0 Comments