मुरली कृष्णा परिवाराचा आधारवड हरपला

 मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या संचालिका सीतामहालक्ष्मी छल्ला यांचे निधन



चंद्रकांत कदम पारनेर

जगभरात औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या संचालिका सीतामहालक्ष्मी छल्ला यांचे मंगळावर (दि.१२) रोजी शिरूर येथे दुःखद निधन झाले. 

       सीतामहालक्ष्मी यांनी गेले अनेक दशके मुरली कृष्णा फार्मा कंपनीचे संचालक पद सांभाळले. औषधनिर्माणशास्त्र मध्ये जगभरातून या कंपनीच्या पदार्थांना मुख्यत्वे मागणी आहे. या कंपनीच्या यशस्वी वाटचालीमध्ये सीतामहालक्ष्मी यांचा मोलाचा वाटा होता. त्या मूळच्या आंध्र प्रदेश राज्यातील असून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे त्यांनी कंपनी स्थापन केली होती. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी शिरूर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस मुरली कृष्णा फार्मा परिवारासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुरली कृष्णा फार्मा कंपनीच्या सीएमडी सत्या वडलामणि यांच्या मातोश्री व कृष्णा वडलामणि यांच्या त्या आजी होत.

Post a Comment

0 Comments