उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते.
पारनेर (प्रतिनिधी) –
पिंपरी जलसेन येथे पार पडलेल्या पिंपरी जलसेन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘अहिल्या 11’ संघाने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीन दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेत अहिल्या 11 संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.
![]() |
| पिंपरी जलसेन प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना "अहिल्या ११" संघातील संघमालक अनंतकुमार काळे, संकेत कदम, कर्णधार लखन थोरात व इतर खेळाडू. छाया - चंद्रकांत कदम. |
अंतिम सामन्यात ‘अहिल्या 11’ संघाने प्रभावी खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘डिके वॉरियर्स’ संघाने द्वितीय क्रमांक, ‘साई क्लिअरिंग सुपर किंग्स’ तृतीय क्रमांक, आणि ‘मराठा वॉरियर्स 11’ चतुर्थ क्रमांक मिळवला.विशेष पारितोषिक विजेते मॅन ऑफ द सिरीज विजय बोरुडे,बेस्ट बॉलर अजित कदम, बेस्ट बॅटमॅन भूषण थोरात, बेस्ट फिल्डर दिपक काळे,
तसेच एआरडी एलेव्हेटर्स स्ट्राईकर्स, आणि व्हीएस इंटरप्रायजेस टायटन्स या संघांच्या उत्कृष्ट सहभागाचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रीमियर लीगसाठी जी एस महानगर बँकेच्या संचालिका छाया रामदास वाढवणे व ठाणे जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रामदास वाढवणे यांच्याकडून चारही क्रमांकाची बक्षिसे व ट्रॉफी स्वहस्ते देण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन जी. एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली उदयराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले होते. या भव्य आयोजनामागे उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे मोठे योगदान राहिले.
स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग, प्रेक्षकांचा उत्साह आणि संपूर्ण गावातील एकोप्यामुळे ही स्पर्धा एक संस्मरणीय सोहळा ठरली. अहिल्या ११ संघामध्ये संघमालक संकेत कदम, अनंतकुमार काळे, कर्णधार लखन थोरात व चार्टर्ड अकाऊंटंट किरण कदम यांनी विजयी संघातील खेळाडूंना मार्गदर्शन केले.

0 Comments