माहिती अधिकार जनजागृती समितीच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी कैलास गाडीलकरयांची निवड


पारनेर 
निस्वार्थ जनहित बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित माहिती अधिकार जनजागृती समितीच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी कैलास सीताराम गाडीलकर यांची निवड झाली.
      त्यांची निवड संस्थेचे अध्यक्ष अजय तुम्मे यांच्या हस्ते नाशिक येथे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी संस्थेचे पुणे व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजू पाटील ढमढेरे व बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल पारनेर तालुक्यातील व कुरुंद ग्रामस्थांकडून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments