"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कार्य दिपस्तंभा सारखे;सरपंच ठकाराम लंके


निघोज येथे दहावी,बारावी उर्तीण विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ--

निघोज/प्रतिनिधी:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने निघोज(ता.पारनेर)येथे दहावी,बारावी,पदवीधर गुणवंत उर्ती 'ण विद्यार्थांचा सत्कार समारंभ तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती उत्सव निघोज गावचे प्रथम नागरिक कार्यसम्राट सरपंच  माननीय श्री  ठकाराम लंके  यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्ध पुतळ्यास  पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.सरपंच ठकाराम लंके यांच्या हस्ते दहावी,बारावी व पदवीधर झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच ठकाराम लंके बोलतांना म्हणांले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे कार्य दिपस्तंभा सारखे असुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समाजप्रबोधन,लोकजागृती साठी मोठे योगदान दिले आहे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आज च्या तरुण युवकांनी समाजाला अभिप्रेत असलेले कार्य करावे असे भावनिक आव्हान केले.येथिल दलित वस्तीचा विकास व्हावा म्हणून ग्रामपंचायत व आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या माध्यमातून येत्या काळात मोठय़ा प्रमाणांत विकासकामे मार्गी लावून गोरगरीब गरजूंसाठी अनेक योजना राबविणांर असल्यांचे प्रतिपादनही सरपंच लंके यांनी व्यक्त केले.
         यावेळी निघोज येथिल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोना विषाणू पासून धोका टाळण्यांसाठी मोठ्या संख्येने मास्कचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश साळवे,प्रकाश साळवे, बाळासाहेब साळवे,शशिकांत साळवे,शिवाजी वैरागर,प्रवीण साळवे,कचरु साळवे,मोहन साळवे, ज्ञानदेव साळवे,विशाल साळवे,कैलास साळवे,संजय साळवे,भीमराव साळवे,पोपट साळवे,हिरामण साळवे,एकनाथ साळवे,विष्णू अल्हाट,मधुकर अवचिते,संपत वैरागर,गणेश साळवे,अशोक साळवे, रवि साळवे,अरुण साळवे,गोरक्ष साळवे,शुभम साळवे,करण साळवे,वैभव साळवे,अविनाश साळवे, अशोक वैरागर,बबन बोरगे,सचिन जाधव,सचिन साळवे,राहुल साळवे,सुयश साळवे,अनिरुद्ध अवचिते,अनिकेत अवचिते,प्रथमेश सोनवणे,राज सोनवणे  सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.जी.एस.महानगर बँकेचे अधिकारी श्री लक्ष्मण साळवे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले,शेवटि लहु वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments