नवरात्र उत्सवानिमित्त आजपासून चिंचोली येथे श्रीमद् भागवत कथा

 

पारनेर 

पारनेर तालुक्यातील चिंचोली येथे श्री मळाई वडजाई नवरात्र उत्सवानिमित्त आजपासून सात दिवस श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री मळाई वडजाई देवस्थान चिंचोलीच्या वतीने करण्यात आले आहे. 

         नवरात्रोत्सवानिमित्त बुधवार दि. २४ पासून ह. भ. प विश्वनाथ महाराज रिठे यांच्या अमोघ वाणीतून श्रीमद् भागवत कथा होणार आहे. यामध्ये खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा देखील कार्यक्रम होणार आहे. विश्वनाथ महाराज रिठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व दसरा शिलंगण खेळणे, देवीची पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चिंचोली मळाई वडजाई देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments