कोरोना व्हायरसला घाबरु नका,सावधनता बाळगा सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला सहज हरवु ; डाॕ.सुरेश उचाळे


निघोज 
                                                                                  निघोज(ता.पारनेर)येथिल सर्वसामान्य कुटुंबातील डाॕ.सुरेश उचाळे एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण करुन मुंबई येथे दवाखाना चालवित होते.कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभुमीवर १५ मार्च पासुन आजपर्यंत ४ महिने मुंबईमध्ये न थकता न थांबता सेवा देत आहेत.                                        
          गरिब परिस्थितीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे सामाजिक बांधिलकी नसानसात भिनलेली.त्यामुळे मुंबई महापालिकेत  वैद्यकिय आधिकारी म्हणुन सेवेत रुज झाले.मुंबई महापालिका एकुण २४ प्रभागामध्ये विभागली गेलेली आहे.डाॕ.सुरेश उचाळे सी वाॕर्ड वैदयकीय आरोग्य अधिकारी म्हणुन काम पाहत आहे.सी वाॕर्डचे खाजगी व सरकारी वैदयकीय प्रमुख म्हणुन कोरोना बद्दल ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.जबाबदारी पलीकडे जावुन कोरोनाला न घाबरता प्रशासकीय नियम पाळण्याचे आवाहन सी प्रभागामध्ये करत आहे.या प्रभागामध्ये कालबा देवी, भुलेश्वर काॕपर मार्केट, लोहार चाळ ,मोहम्मद अली रोड दवाबाजार आदी महत्त्वाच्या बाजारपेठा येत आहे.डाॕ.उचाळे हे मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त  चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.उचाळे हे संस्थात्माक विलगीकरण ५ सरकारी दवाखाने तीन खाजगी दवाखाने, आरोग्यकेंद्र ,प्रस्तुतीगृहाचे प्रमुख आहेत.   
           आपल्या जन्मभुमीशी असलेली तळमळ पाहुन त्यांनी बुधवार( दि.१२)रोजी निघोज(ता. पारनेर)येथे निघोज ग्रामीण नागरी पतसंस्थेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕक्टर ,खाजगी डाॕक्टर, कोरोना दक्षता समिती व  निघोजकरांना प्रात्यक्षिके दाखवुन मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मळगंगा नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर कवाद,निघोज ग्रामीण नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद ,सरपंच ठकाराम लंके,ग्रामसेवक डि.जी.वाळके ,व्यवस्थापक दत्ताञय लंके ,शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद ,मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वास शेटे,महेश ढवळे, प्राथमिक आरोग्यअधिकारी रोहिनी डोणे,पोलिस हेडकॕन्सटेबल व्ही.एस लोणारे ,डाॕ.पांडुरंग थोरात,डाॕ.विशाल सुपेकर, डाॕ.प्रदीप खोसे,डाॕ.चेतन झावरे ,निघोज ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी:निघोज(ता.पारनेर)येथिल निघोज ग्रामीण नागरी पतसंस्थेत मार्गदर्शन करतांना डाॕ.सुरेश उचाळे .



डाॕ.सुरेश उचाळे यांच्या सारख्या तालुक्यातिल इतर ही भुमिपुत्रांनी आपआपल्या गावात कोरोणा रोगाच्या महामारीत आपत्ती व्यवस्थापन पर आरोग्य शिबीरे व मार्गदर्शन केल्यांने ग्रामिण भागातिल नागरीकांच्या मनातिल भिती निश्चितच दूर होवून दिलासा मिळेल.(सरपंच. ठकाराम लंके)

Post a Comment

0 Comments