स्वातंत्र्य दिनानिमित्त राळेगण थेरपाळ मध्ये रक्तदान शिबिर ; सरपंच पंकज करखीले यांचा स्तुत्य उपक्रम


पारनेर 
      स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील गावाने घालून दिला आहे. सरपंच पंकजदादा कारखीले यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात साजरा होत असलेला ७४ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा होत आहे. शाळा महाविद्यालये यांना सुट्ट्या असल्याने शिक्षक व ग्रामपंचायत पदाधिकारी व काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. अशातच पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सरपंच पंकजदादा कारखिले यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये सुमारे ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सरपंच कारखिले हे नेहमी समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या समाजिक संकल्पनेबाबत पारनेर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
   उदय माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. सरपंच पंकजदादा कारखिले यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावीत प्रथम आलेली विद्यार्थिनी प्रतीक्षा चंद्रकांत कारखीले या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यावेळेस सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, संदीप घावटे, शशिकांत कारखिले, सुखदेव कारखिले, किरण बाळासाहेब कारखिले, शिरीष कार्ले, अतुल गायकर, नरेश सोनवणे, अतुल मोरे, मंगेश कार्ले, निलेश शितोळे, प्रसाद शितोळे, पांडुरंग बेंडाले, उमेश आरण्ये, अभिषेक जाधव, आबा कारखिले, प्रवीण कारखिले, गवळी प्रशांत, शादिक सय्यद, शाहरूख सय्यद, सतिश शितोळे, संदीप रासकर, सागर कारखिले, दिनेश कारखिले, विजय कारखिले संजय गाडीलकर, वैष्णव शितोळे, प्रवीण खोटे, दामोदर कारखिले, संजय कारखिले, सुमित कारखिले, पंकज किसन कारखिले, सुयश कारखिले, शशिकांत कार्ले,सचिन गवळी, सालके गणेश आकाश सालके,, संकेत कारखिले, विकास चत्तर, संकेत वाढवणे, स्वप्नील आढाव आदी उपस्थित होते.

उदात्त भावनेतून सामाजिक उपक्रम - सरपंच कारखीलेआपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून सामाजिक उपक्रम राबवत आहे. नागरिकांचा देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने सामाजिक काम करताना पाठबळ मिळत आहे. समाजासाठी व नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहणार आहे.सरपंच पंकजदादा कारखिले

Post a Comment

0 Comments