अध्यात्मातून प्रबोधन करणारे शाहीर बाळासाहेब बोरुडे


 अध्यात्मातून प्रबोधन करणारे शाहीर बाळासाहेब बोरुडे

चंद्रकांत कदम पारनेर

सध्याच्या भौतिक युगात व इंटरनेटच्या युगात मानवाने जग जवळ जरी आणले असले तरी आपली संस्कृती, परंपरा व अध्यात्म जपणे गरजेचे आहे. यासाठी सध्या किर्तन, प्रवचन, सत्संग यांच्या माध्यमातून समाजापुढे अध्यात्मातून प्रबोधन करणे सुरू आहे. पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शाहीर बाळासाहेब बोरुडे हे भेदिकाच्या माध्यमातून समाजामध्ये आध्यात्मिक प्रबोधन करत आहे. यांच्या प्रबोधनाची दखल घेत थेट आकाशवाणीने बोरुडे यांना आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी दिली आहे. 

           शाहीर बाळासाहेब बोरुडे हे शाहिरी आवाजात भेदिक, भजन आदी कार्यक्रम करण्यात अव्वल आहेत. पारनेर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात त्यांच्या भेदिकांची सर्रास कार्यक्रम होत असतात. एकनाथ महाराजांच्या भारूडाप्रमाणे भेदिकाच्या माध्यमातून आध्यात्मिक व धार्मिक प्रबोधन शाहीर बाळासाहेब बोरुडे करत आहेत. पिंपरी जलसेन येथील अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या हिमतीवर त्यांनी या क्षेत्रात मोठे नाव कमविले आहे. त्यांच्या भेदिकांच्या कार्यक्रमाची दखल घेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये त्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत आकाशवाणीने त्यांच्यासोबत करार देखील केला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सप्ताह, यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये बोरुडे यांच्या भेदिकांचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. 

           शाहीर बाळासाहेब बोरुडे यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कार यानिमित्ताने मिळाले आहेत. त्यांनी या क्षेत्रात उपजीविकेचे साधन न समजता समाज प्रबोधन कसे करता येईल यावर भर दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे.

Post a Comment

0 Comments