जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पठारेंची भेटीची तालुक्यात चर्चा
![]() |
| युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सन्मान करताना शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे व इतर मान्यवर. |
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुका उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची समजली जात असून तालुक्यातील शिवसैनिकांना एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे.
मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरेंसोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सन्मानयुक्त आघाडी होत नसेल तर पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत आदित्य ठाकरेंनी दिल्याचे समजले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तालुकाप्रमुख म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडे दिल्याचे समजते आहे. यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांनी आ. सचिन अहिर यांची देखील भेट घेऊन तालुक्यातील शिवसेनेच्या बांधनीबाबत चर्चा केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, बाजारसमिती उपसभापती किसनराव सुपेकर, युवासेना तालुका संघटक आदिनाथ कदम, ज्येष्ठ शिवसैनिक पिराजी पवार, शिवाजी लाळगे यांच्यासोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील विकास निधीबाबत असो किंवा संघटना वाढीसंदर्भात मला कधीही फोन करा किंवा भेटीला या मी तुम्हाला मदत करेल हा विश्वास तुम्हा पारनेरकरांना देतो.
आ. सचिन अहिर (विधान परिषद सदस्य)

0 Comments