स्व.माधवरावजी दगडूजी मुळे प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित शिक्षण महर्षी माधवराव जी मुळे तथा आबा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त स्मृती करंडक जिल्हास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या सदर स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या ११४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने चित्रकला स्पर्धा आयोजन दरवर्षी जिल्हास्तरावर स्व.माधवरावजी दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते.बालकांमध्ये कलेची आवड निर्माण करणे त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि या ना त्या प्रकारे सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय करणे हा महत्त्वपूर्ण उद्देश या स्पर्धेचा आहे.
सदर स्पर्धा घेण्याकरीता विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन भुजबळ उपप्राचार्य नानासाहेब काळे यांनी मार्गदर्शन केले. आयोजनाकरिता पर्यवेक्षक संतोष इंगळे कला विभागप्रमुख ज्ञानेश्वर कवडे ,रिमा भिंगारदिवे,सुरेखा थोरात,कल्पना नरसाळे,सुरज घोडके व संदीप पांढरे यांनी पुढाकार घेतला व स्पर्धा यशस्वी केली.

0 Comments