पारनेर (प्रतिनिधी)
पिंपरी जलसेन गावामधील युवा नेतृत्व, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक आदिनाथ कदम यांची युवासेनेच्या पारनेर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी आदिनाथ कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
![]() |
| पारनेर तालुका युवासेनेच्या तालुकसंघटक पदी निवड झाल्याबद्दल आदिनाथ कदम यांचा सन्मान करताना शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे. छाया - चंद्रकांत कदम. |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आदिनाथ कदम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे कदम यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे विचार घरोघरी पोहचवून आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला.
समाजकारण, राजकारणात सक्रिय झाल्यापासून आदिनाथ कदम शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पक्षनिष्ठेची दखल घेऊन त्यांना पक्षाच्या उपशाखाप्रमुख, सोशल मीडिया प्रमुख पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तालुक्यात सत्तांतर झाले तरीही आदिनाथ कदम यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आपले पक्षकार्य सुरूच ठेवले आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्याप्रमाणात बंड होऊन फूट पडली असली तरीही आदिनाथ कदम यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षालाच साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि याच निष्ठेचा विचार करून त्यांना तालुका संघटक पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. आदिनाथ कदम यांना नियुक्ती पत्र तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.
सर्वधर्मीयांना सोबत घेऊन जाणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन तालुक्यात शिवसेनेची संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने शिवसेना पक्ष वाडीवस्तीवर पोहचवण्याचे काम करणार आहे. गावोगावी भक्कम असलेले शिवसेना युवासेनेचे संघटन अधिक भक्कम करण्यासाठी आपण तन-मन-धनाने पुढाकार घेणार आहोत
आदिनाथ कदम (नवनिर्वाचित तालुका संघटक)

0 Comments