काश्मीरमधील हिंदूंवरील हिंसाचाराचा पिंपरी जलसेनमध्ये निषेध




पारनेर

काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला करून हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी जलसेन ग्रामस्थ व सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तान च्या प्रतिकात्मक मूर्तीचे व पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करण्यात आले.






देशामध्ये हिंदूंवर वारंवार होत असलेले हल्ले होत आहेत. तसेच काश्मीर मध्ये नुकत्याच हिंदू पर्यटकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक पर्यटकांचा बळी अतिरेक्यांनी घेतला. केंद्र शासनाने या अतिरेक्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी व पाकिस्तानी अतिरेक्यांच्या निषेध करण्यासाठी पिंपरी जलसेनमध्ये सकल हिंदू समाज व ग्रामस्थांच्या वतीने शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निलेश शेळके (समन्वयक, हिंदवी विचारधारा), दादाभाऊ मार्तंड बोरुडे (सर), गणेश पुणेकर, भास्कर रामू शेळके, संतोष बोरुडे, बापू थोरात (मेजर), बाळासाहेब शिंदे, आदिनाथ संतोष कदम, गणेश वाढवणे (पाटील), ऋषिकेश काळे, प्रवीण शेळके, संतोष परांडे, रंगनाथ वाढवणे, कैलास घेमुड, राजू थोरात, रमेश वाढवणे, रेवजी कदम, सिद्धेश वाढवणे, आदित्य अडसरे, नवनाथ कदम, विश्वनाथ कदम, बबन थोरात, समस्थ महिला आणि सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थ पिंपरी जलसेन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments