दिग्विजय वाखारे यांची तटरक्षक दलाच्या असिस्टंट कमांडंट वर्ग एक पदी निवड.

                     


       राळेगण थेरपाळ - प्रतिनिधी (जयदीप कारखीले )

गोलेगाव ता.शिरूर जि .पुणे  दिग्विजय याची भारतीय तटरक्षक दला मध्ये (संरक्षण मंत्रालय भारत सरकार ) असिस्टंट कमांडंट वर्ग एक पदी निवड झाली.दिग्विजय याचे प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शिक्षण हे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशाला शिरूर येथे झाले त्यानंतर त्याने नाशिक येथील के.के.वाघ या कॉलेज बी टेक करून पुणे येथे वै. मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान अंतर्गत सहकार मंत्रालय भारत सरकार या युनिव्हर्सटीमध्ये सध्या एम.बी.ए करत आहे. त्याचे आई,वडील हे प्राथमिक शिक्षक असून डॉ.अनिल विठ्ठलराव वाखारे,व सीमा अनिल वाखारे यांचा मुलगा असून पत्रकार जयदीप कारखिले,सागर कारखिले यांचा हा भाचा आहे. व जिल्हा बँकेचे ऑडिटर शामराव कारखिले यांचा हा नातू आहे.त्याच्या या यशाबद्दल राळेगण थेरपाळ चे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, गोलेगाव चे सरपंच दिपाली पडवळ, तसेच नेत्रतज्ञ डॉ.स्वप्नील भालेकर, डॉ राम मगर, ॲड निनाद मगर, यांनी कौतुक केले आहे. तसेच शिरूर परिसरातील शिक्षक संघटनांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments