साक्षरता अंक वाढवण्यासाठी ग्रीनलाईफ फाउंडेशन, पुणे तर्फे विविध उपक्रम -राजेश मोरे

 पारनेर प्रतिनिधी महेश शिंगोटे 



महाराष्ट्रातील आदिवासी भागातशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ग्रीनलाईफ फाउंडेशन, पुणे या अधिकृत सामाजिक संस्थेने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेतर्फे हा उपक्रम 2015 पासून राबविला जात असून 2024 यावर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील 350 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट्स पुरविले आहेत. या उपक्रमात पुणे,सातारा, रायगड व अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या एकूण 14 शाळांचा समावेश आहे. 

लोकसहभातून राबविल्या जाणाऱ्या या सामाजिक उपक्रमामागील एकमेव उद्देश्य हा दुर्गम डोंगराळ भागात शिक्षणाचा प्रसार करून महाराष्ट्र राज्याचा साक्षरता अंक वाढविणे आहे. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश या गोष्टी मिळतात पण अभ्यासासाठी लागणारे इतर साहित्य मिळत नसल्यामुळे हे शालेय साहित्य संस्थेतर्फे पुरविले जात आहे. 


कुरण वस्ती व बुळेपठार तालुका - राहुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 25 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

पुढील शैक्षणिक वर्षात यात अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या आणखी शाळांचा समावेश होणार आहे. या उपक्रमात शालेय साहित्य , वृक्षारोपण, प्लॅस्टिक मुक्त परिसर असे पर्यावरणाच्या सुधारणेसाठी अनेक उपक्रम घेतले जातात.

Post a Comment

0 Comments