भाग्याचा उदय झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही.-ह.भ.प.गुरुराज महाराज देगलूरकर

 वडझिरे प्रतिनिधी- महेश शिंगोटे.

सुवर्ण महोत्सवी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने आज दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा ह.भ.प.गुरुराज महाराज देगलूरकर पंढरपूर यांची संपन्न झाली.

छाया - महेश शिंगोटे

महाराजांनी संतश्रेष्ठ जगतवंदे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वाररकरी संप्रदायातील प्रसिद्ध असा स्व स्थिती चे वर्णन करणारा अभंग

जालो बळीवंत ! होऊनिया शरणागत !!

 केला घरांत रिघावा ! ठायी पीडियेला ठेवा !!

या अभंगावर बोलताना संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे व परिस्थितीचे वर्णन अनेक उत्कृष्ठ दाखले देत केले.

जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या प्राप्त झालेल्या स्थितीचे वर्णन करत म्हणतात मी बळीवंत झालो, बलवान झालो.अस त्यांच्या भक्तांना अनुयांना सांगायला सुरुवात केली.

माझ्या घरचे ऐश्वर्य संपन्न ते दुष्काळामुळे दारिद्रय हा झालेला बदल त्यांनी सांगितला...कितीही मोठी संकटे आली तरी एकदा संत चरित्राचे चिंतन करा सगळी संकटे दूर होतील.संकटांचे रूपांतर संधीत कसे करावे हे संतांकडून शिकावं. अतिशय गोड मधुर वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या प्रसंगी उपस्थित मा.सरपंच बाळासाहेब दिघे,युवानेते अनिल गंधाक्कते,चेअरमन पांडुरंग गंधक्कते,रावसाहेब मोरे,व्हा.चेअरमन राजकुमार मोरे,रामाशेठ एरंडे,सरपंच निलेश केदारे,शिवाजीराव औटी,कैलास चौधरी,राजाभाऊ मोरे,लक्ष्मण दिघे,शिवाजी आप्पा मोरे,महादेव तोडकर,अण्णा मोरे,हरिभाऊ चौधरी,पंढरीनाथ ढवळे,गणेश तोडकर,आशिष एरंडे,गणेश शेटे,संतोष खिलारी,माऊली पानसरे,लालु मोरे,योगेश तोडकर,वैभव पानसरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सूत्रसंचालन तुळशीराम करकंडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments