वडझिरे प्रतिनिधी - महेश शिंगोटे
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सुवर्ण महोत्सवी तुकाराम बीज निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात झाली. प्रथम दिवशी ह.भ.प रामायणचार्य नामदेव महाराज लबडे नाना श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कीर्तनाने आरंभ झाला.
![]() |
| वडझिरे येथे सुवर्णमहोत्सवी आयोजित सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची किर्तनसेवा करताना हभप. लबडे नाना. (छाया - महेश शिंगोटे) |
यावेळी बोलताना महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा कामामध्ये काम ! काही म्हणा रामराम ! जाईल भवश्रम ! सुख होईल दुःखाचे !! या अभंगाचे निरुपण करताना तुकाराम महाराज लोकांना उद्देशून म्हणतात की, तुम्ही येथे संसाराच्या रगाड्यात कितीही व्यस्त असलात तरी कितीही कामात गुंतलेले असाल तरीही त्या कामात अजून एक काम करा ते म्हणजे इतर कामे चालू असताना मुखाने रामराम म्हणा म्हणजे तुमचा भव श्रम कमी होईल.तो पूर्णपणे निवारेल हे तुम्हाला कळणारही नाही.त्याने संसारातील सर्व दुःखाचे सुखात परिवर्तन होईल....
या प्रसंगी उपस्थित मा.सरपंच बाळासाहेब दिघे,युवानेते अनिल गंधाक्कते शिवाजीराव औटी,राजाराम एरंडे,रावसाहेब मोरे,राजकुमार मोरे,शिवाजी आप्पा मोरे,महादेव तोडकर,अण्णा मोरे, संतोष दिघे आदींसह समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन तुळशीराम करकंडे यांनी केले.

0 Comments