पारनेर तालुक्यात शिवसेनेची आढावा बैठक व भव्य मोर्चा

 पारनेर तालुक्यात शिवसेनेची आढावा बैठक व भव्य मोर्चा


पारनेर  (चंद्रकांत कदम)

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात पदाधिकारी व शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अलीकडील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

शिवसेना (उबाठा) यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक


या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय पारनेर येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत तर अध्यक्षस्थानी शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत अण्णा पठारे होते.


मोर्चादरम्यान प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये गॅस एजन्सींकडून ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी तसेच कांद्याला प्रति किलो १० रुपये अनुदान जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.


तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर कार्यवाही करावी, अन्यथा पुढील दहा दिवसांत शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवर :

उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, मा. पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख अनिलजी शेटे, मा. तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, शहर प्रमुख निलेश खोडदे, जिल्हा समन्वयक सखाराम उजघरे, विधानसभा प्रमुख संतोष येवले, शिक्षकसेना तालुकाप्रमुख अर्जुन आढाव, उपतालुकाप्रमुख नितीन शेट आहेर, उपतालुकाप्रमुख संदीप शेट मोढवे, उपतालुकाप्रमुख कैलास शेट ढोमे, उपनगराध्यक्ष राजू भाई शेख, महिलाआघाडी प्रमुख सुनीताताई मुळे, शेतकरीसेना तालुकाप्रमुख किसनराव चौधरी, युवासेना तालुका संघटक आदिनाथ संतोष कदम, शिवसेना समन्वयक मंगेश पाटील सालके, शिवसेना संघटक अमोल गजरे, सहसंघटक किरण सुपेकर, गटप्रमुख बाबासाहेब रेपाळे, गणप्रमुख संतोष शेट साबळे, मोहन शेट परांडे, मनोज व्यवहारे, ढवळपुरी येथील आयुब भाई शेख, अंबर पवार, सरपंच रामदास शेट खोसे, सरपंच साहेबराव खरात, सोशल मीडिया प्रमुख राहुल मोरे, चेअरमन संतोष लामखडे, सरपंच अशोक पंडित, शाखाप्रमुख शरद जगदाळे, कामारगाव येथील राजेंद्र लाळगे, अतुल मुळे, सुयोग टेकूडे, सोशल मीडिया प्रमुख शुभम पाडळे, शिवाजी शेट लाळगे, सुभाषजी भोसले, पारनेर सोसायटी चेअरमन सतीश औटी, शाखाप्रमुख सुनील आरोटे, संपत खोडदे, अक्षय बेलोटे, लहू गाडगे, प्रशांत पठारे, विशाल पठारे, नितीन खोडदे, सुहास व्यवहारे, सुरेश बुचुडे, पप्पू गाडगे, पप्पू शिंदे, बंडू मोरे, कुसुमताई मुळे, गोरख औटी, मंगेश जाधव, अजय साळवे, ग्रामपंचायत सदस्य सागर मते, आदित्य महांडुळे, रंगनाथ मुळे, राजू पथवे, संतोष केदारी, धनंजय पोटघन, मंगेश खणकर, प्रकाश ठुबे, संकेत ढोकळे, प्रमोद शिंदे, पांडुरंग सुपेकर, निलेश वरखडे, अरविंद जाधव, ज्ञानदेव सुंबे, दीपक घावटे, रमेश रासकर, बाळासाहेब खोसे, ऋषिकेश माने व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments