पिंपरी जलसेनमध्ये भक्तीचा महापूर; अखंड हरिनाम सप्ताहास उद्यापासून प्रारंभ

 पिंपरी जलसेनमध्ये भक्तीचा महापूर; अखंड हरिनाम सप्ताहास उद्यापासून प्रारंभ

पिंपरी जलसेन | चंद्रकांत कदम

पिंपरी जलसेन (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे श्रीराम नवमी व श्री हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास उद्यापासून (गुरुवार.ता २६) भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे. तब्बल ९४ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या सप्ताहामुळे संपूर्ण गाव आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाले आहे.


संत परंपरेचा जागर करत सप्ताहात संत एकनाथ कथामाला, हरिपाठ, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व हरिकीर्तनाचे कार्यक्रम दिवसभर रंगणार आहेत. विशेष म्हणजे सायंकाळी होणारी संत एकनाथ कथामाला भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

https://www.instagram.com/reel/DWRbAAxjD4L/?igsh=MW0zM3M1dmVndG51Mw==

या सप्ताहात ह.भ.प. परमेश्वर महाराज दंडवते, ह.भ.प. संभाजी महाराज दरोडे, ह.भ.प. धनंजय महाराज उदावंत, ह.भ.प. गंगाराम महाराज खोडदे, ह.भ.प. भगवानजी महाराज शास्त्री, ह.भ.प. बाळशीराम महाराज मिंडे, ह.भ.प. प्रेमानंदजी महाराज शास्त्री, ह.भ.प. डॉ. मोहिनीताई पाबळे, ह.भ.प. गणेशजी महाराज शेंडे, ह भ प गणेश महाराज शिंदे, ह.भ.प. आबासाहेब महाराज गोडसे आदी नामांकित कीर्तनकार व प्रवचनकारांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच ह.भ.प. सुभाष महाराज मगर यांची संत एकनाथ कथामाला दररोज सायंकाळी होणार आहे.

सप्ताहादरम्यान महाप्रसाद, सामुदायिक भोजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून गावातील ग्रामस्थ, मुंबईकर व पुणेकर मंडळी मोठ्या उत्साहाने तयारीत गुंतली आहेत.

भक्ती, ज्ञान आणि संस्कारांचा संगम ठरणाऱ्या या सोहळ्याचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सप्ताहाचे लाइव्ह प्रक्षेपण होणार

पिंपरी जलसेन येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ अधिकाधिक भाविकांना घेता यावा यासाठी संपूर्ण सप्ताहाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. गावाबाहेरील तसेच परदेशात असलेल्या भाविकांनाही घरबसल्या कीर्तन, प्रवचन व संत एकनाथ कथामालेचा आनंद घेता येणार आहे.

यामुळे या भक्तिमय सोहळ्याचा आध्यात्मिक लाभ अधिक व्यापक स्तरावर पोहोचणार असून भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments