भगवंताला शरण जा...जीवन आनंदमय होईल -ह.भ.प डॉ. नारायण महाराज जाधव.

 वडझिरे प्रतिनिधी - महेश शिंगोटे

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे सुवर्ण महोत्सवी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प डॉ.नारायण महाराज जाधव आळंदी यांची संपन्न झाली.

वडझिरे येथे सुवर्ण महोत्सवी सप्ताहात कीर्तनरूपी सेवा देताना हभप. डॉ. नारायण महाराज जाधव..(छाया - महेश शिंगोटे)

महाराजांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेतील चार चरणाचा सर्वांच्या मुखातील गाजलेला अभंग

आलिया भोगासी असावे सादर !

देवावर भार घालुनिया ! १!

मग तो कृपासिंधु निवारी साकडे!

येर तें बापूडे काय रंक !!

भयाचिये पोटी दुःखाचिया राशी !

शरण देवासी जाता भले !३!

तुका म्हणे नव्हे काय त्या करिता !

चिंतावा तो आता विश्वंभर !४!

 यावर चिंतन केले.

देवावर आपल्या योगक्षमेचा भार घालून आलेल्या आपल्या प्रारब्धा नुसार संकटांना तोंड देण्यास तयार रहावे.मग तो कृपा सिंधू साक्षात आपली संकटे दूर करील. इतर दीनबापडे यासाठी काय करणार आहेत. भयाच्या पोटामध्ये अनेक दुःखाच्या राशी लपलेल्या आहेत त्यामुळे देवाला शरण जाणे हाच उत्तम मार्ग आहे.परमेश्वराला पांडुरंगाला या विश्वंभराला काय करणे अशक्य आहे.त्यामुळे त्याचे चिंतन नामस्मरण करत राहावं.जीवन आनंदात नांदू लागेल.

प्रसंगी उपस्थित मा.सरपंच बाळासाहेब दिघे,चेअरमन पांडुरंग गंधक्कते, रावसाहेब मोरे,व्हा.चेअरमन राजकुमार मोरे,अनिल गंधक्कते सरपंच शिवाजी औटी,कैलास चौधरी, ए.पी.आय चौधरी,राजाभाऊ मोरे,लक्ष्मण दिघे,शिवाजी आप्पा मोरे,महादेव तोडकर,अण्णा मोरे,हरिभाऊ चौधरी सर,बाळासाहेब दिघे सर,पंढरीनाथ ढवळे,गणेश तोडकर,रावसाहेब वाळुंज, संदेश वैभव पानसरे आदींसह मुंबईकर पुणेकर मंडळी व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन तुळशीराम करकंडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments