बरं झाला विठोबा तू आमच्या गावाला आला - ह.भ.प.वांजळे महाराज

पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील सुवर्णमहोत्सवी सप्ताहात कीर्तनरूपी सेवा देताना ह.भ.प.चंद्रकात महाराज वांजळे.

वडझिरे प्रतिनिधी- महेश शिंगोटे

वडझिरे मध्ये सुवर्णमहोत्सवी कीर्तन सेवा पार पडत आहेत.चौथ्या दिवसाचे कीर्तन पुष्प ह.भ.प.चंद्रकात महाराज वांजळे पुणे यांनी गुंफले.

छाया- महेश शिंगोटे वडझिरे

यावेळी त्यांनी श्रीमंत जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील विठ्ठलाच्या रूपाचे व नामाचे महात्म्य वर्णन करणारा.

पवित्र होईन चरित्र उच्चारे । रूपाच्या आधारे गोजिरिया ॥१॥

आपुरती बुद्धि पुण्य नाही गाठी । पायी घाली मिठी पाहे डोळा ॥

गाईन ओविया शिष्टांच्या आधारे । सारीन विचारे आयुष्या या ॥२॥

तुका म्हणे तुझे नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥

या अभंगावर आपल्या मधुर तेजस्वी रसाळ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

महाराज म्हणतात हे देवा तुझे ते पवित्र चरित्र गाईन.आणि तुझ्या त्या गोजिऱ्या सुंदर रूपाच्या आधारे माझे जीवन पवित्र करीन. माझी बुद्धी अपुरी आहे आणि माझ्या गाठीला पुण्य नसेल ही पण म्हणून मी तुझ्या पायावर मिठी घालून तुला शरण येऊन तुलाच डोळे भरून पाहीन.

यापुढे महाराज म्हणतात मी विठ्ठला नारायण मी तुझे गुणगान गाईल आणि तुझ्या नामस्मरणात माझे आयुष्य सार्थकी लावेल.यावेळी अनेक दाखले दृष्टांत देत महाराजांनी भगवंतावर प्रेम करणे व त्याला नाम जपातून आपलंस करणे हाच भक्तीचा सोप्पा मार्ग आहे. असे सांगितले. बरं झाल विठोबा तू आमच्या गावाला आला...असे उदगार काढताच उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला टाळ मृदुंगाच्या आवाजात विठ्ठल विठ्ठल नाम घोषाने वडझिरे नगरी काही काळा साठी साक्षात पंढरी वाटू लागली.

सुवर्ण महोत्सवी कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार वडझिरे नगरीत दाखल होणार आहेत.वडझिरे आणि पंचक्रोशी तसेच पुणेकर मुंबईकर मंडळीं महिला महिला बचतगट युवक अबाल वृद्ध यांच्या एकोप्याने या सप्ताहाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. यावेळी समस्थ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments