पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे सोलिसिटर गुलाबरावजी शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सन 2023-24 यावर्षी आदित्य गट, अर्शाद शेख, प्रतीक अडसरे, सार्थक अडसरे व समृद्धी भोंडवे या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेठ कवाद हे होते. आतापर्यंत या विद्यालयाचे 16 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये झळकले असून एनएमएमएस या या परीक्षेमध्ये राष्ट्रीय गुणवत्ता यादीमध्ये तर सार्थी शिष्यवृत्तीसाठी जवळपास 35 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे. विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती यावेळी संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गीतांजलीताई शेळके यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांनी हे वृक्ष संवर्धन करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या वेळी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे , खा. निलेश लंकेचे बंधू दीपक अण्णा लंके, जिल्हा परिषद माजी सभापती काशिनाथ दाते, पंचायत समिती माजी सभापती गणेश शेळके, निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद, माजी तालुका विकास अधिकारी भालेकर साहेब , तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे, माजी सरपंच लहुजी थोरात , भास्कर शेळके, गाजिभोयरेचे भाऊसाहेब खोडदे नाना, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, सरपंच सुरेश काळे यासह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय पठारे सर व पत्रकार चंद्रकांत कदम यांनी केले तर नेरूळ काँग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम कदम यांनी सर्वांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष घालावे - गीतांजली शेळके
सध्याच्या युगात राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन शिक्षणात त्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची यशाची परंपरा उज्वल आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोत्परी सहकार्य करणार असल्याचे मत जी एस महानगर बँकेच्या संचालिका तथा संजीवनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा गीतांजलीताई उदय शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.

0 Comments