पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पाबळ कवडे वस्ती येथील माजी रयत सेवक- निवृत्त कलाशिक्षक रामदास गणपत कवडे सर यांना ध्येय उद्योग समूहाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनऊ चे माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे ध्येय गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.यावेळी युवा उद्योजक नितीन एडके,युवा ध्येय अध्यक्ष लहानु सदगीर, लोणीमावळा सोसायटीचे मा.चेअरमन कैलास गोरडे ,चित्रकार ज्ञानेश्वर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध शाळांमध्ये कला अध्यापनाबरोबरच शालेय परिसरात सुशोभीकरण ,बोलक्या भिंती प्रकल्प , वृक्ष लागवड संगोपन संवर्धन करण्यासाठी सातत्याने पुढाकार होता.निवृत्त झाल्यानंतरही पारनेर तालुक्यातील शाळा परिसर तसेच रस्ते वाडया वस्त्यांवर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
निवृत्तीनंतरही अहिल्यानगर व पुणे जिल्हा परिसरातील ५०० च्या वर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबविला आहे .कवडे वस्ती येथील चाळीस वर्षांपूर्वी श्री दत्त मंदिर व विठ्ठल मंदिर उभारणी चे संकल्पक म्हणून सर्वांना बरोबर घेत लोक सहभागातून धार्मिक कार्यातही मोठे योगदान आहे .
विविध क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

0 Comments