माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत

 प्रतिनिधी - महेश शिंगोटे 



मोराची चिंचोली येथे निसर्ग रम्य वातावरणात जनसेवा विद्यालय वडझिरे मधील सन १९९३ इयत्ता दहावी च्या बॅचचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला.तब्बल ३१ वर्षानंतर शाळा भरल्याने माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी ६८ माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते.स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉ.शांताराम चौधरी,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सपकाळ,प्राध्यापक सचिन आहेर,अंकुश सरडे,मनिषा मोरे,सुभाष सुरुडे,पोपटराव चौधरी,पांडुरंग तोडकर,श्रीकांत मोरे,संभाजी खोसे आदींसह सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी कष्ट घेतले.


सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांची ओळख परेड झाली.इतक्या वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांनाच आनंद झाला होता.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.

बोलताना शिक्षक संभाजी खोसे म्हणाले आपण सर्वजण खूप बिकट परिस्थिती शिकून मोठे झालो आहे पण आपल्या सर्वांना गरिबीची जान आहे.समजाप्रती आदर आहे.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments