पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आशाबाई संतोष चौधरी या उपसरपंचपदी बहुमताने निवडून आल्या आहेत. पूनम खुपटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणुकीत आशाबाई संतोष चौधरी यांना सहा मते तर विरोधात अर्ज भरलेल्या राहुल सखाराम बाबर यांना पाच मते मिळाली. या निवडीबद्दल सरपंच राहुल सुकाळे, पूनम खुपटे, रमेश वाजे, रेखा येवले, स्वाती न-हे ,मनीषा बाबर ,संतोष पवार ,शोभा येवले ,शैला जगदाळे याच्या सह ग्रामस्थांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. निवडणूक आधिकारी म्हणून ग्रामसेविका सारिका मेहत्रे यांनी कामकाज पाहिले.
आशाबाई चौधरी यांना सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला असून त्या जेष्ठ समाजसेवक कै. मुरलीधर महादू चौधरी यांच्या सुनबाई तर माजी सरपंच कै. भिकाजी नामदेव नऱ्हे यांच्या कन्या होत. वडील आणि सासरे यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याचा मानस आशाबाई चौधरी यांनी व्यक्त केला.



0 Comments