दिशांत काळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी...

 पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील दिशांत संदीप काळे याने शिष्यवृत्ती परीक्षेत २३८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ६८ वा क्रमांक मिळविला आहे. तसेच NMMS परीक्षेमध्ये १३३ मार्क मिळवले आहे. दिशांत हा सध्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी चा विद्यार्थी आहे. 


           विद्यालयाच्या पूर्व माध्यमिक इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत हे यश संपादन केले आहे. दिशांत हा पिंपरी जलसेन येथील माजी उपसरपंच संदीप काळे यांचा मुलगा आहे. दिशांत च्या यशात शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल आहे. या यशाबद्दल जी एस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजलीताई शेळके, माजी सरपंच लहू थोरात, माजी सरपंच भास्कर शेळके, उद्योजक बाळासाहेब चत्तर, तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पिंपरी जलसेन ग्रामस्थांनी दिशांत चे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments