भिवडी येथे कलशारोहण व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा

 सुदर्शन दरेकर:

भिवडी तालुका जावली येथे सोमवार दिनांक 29 एप्रिल पासून भैरवनाथ व हनुमान मंदिराच्या उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आह. सकाळी आठ वाजता मूर्तींची भव्य मिरवणूक व मंगल कलश यात्रा गावातून काढण्यात येणार आहे. जुन्या मूर्तींचे विसर्जन नवीन मूर्तींची धन्यशय्या व देवता आवाहन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा ते आठ एकनाथी भारुड ह भ प सावता महाराज फुले सातारा यांचे आयोजित केले आहे.



मंगळवार 30 एप्रिल रोजी मूर्तींचा जलाधिवास व सर्व प्रकारचे स्नाने होम हवन,सायंकाळी महाराष्ट्राच्या संप्रदायचे व लोकसंगिताचे स्वारदर्शन घडविणारा कार्यक्रम स्वरदर्शन व नंतर महाप्रसाद होईल.

बुधवार दि. 1मे रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आंबवडे प.पू.महाराज यांचा आगमन सोहळा व कलशरोहन सोहळा या कार्यक्रमच्या निमित्ताने भिवडी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती.

कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या माहेवशिणीचा सन्मान व मान्यवरांचा सत्कार होईल.

सायंकाळी हभप आनंद महाराज जाधव(कर्जत) याचे हरिकीर्तन व रात्री महाप्रसाद होईल.तीन दिवस् चालणाऱ्या या दैदिप्यमान कार्यक्रमाची शोभा आपल्या उपस्थितीने नक्कीच वाढेल तरी आवश्य लाभ घ्यावा ही ग्रामस्थ मंडळ व मंदिर नियोजन कमिटी यांचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments