पिंपरी जलसेनच्या वैष्णवी चत्तर हिला मुंबई कॉलेज मध्ये बारावीत ९२ टक्के

 एसआयईएस कॉलेज नेरूळ मध्ये द्वितीय क्रमांक


पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील व सध्या मुंबई येथे स्थित असलेल्या वैष्णवी बाळासाहेब चत्तर हिला एसआयईएस कॉलेज नेरूळ यथे १२ वी मध्ये वाणिज्य विभागातून ९२ टक्के मार्क मिळवून कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

        पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील चत्तर कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने स्थित आहे. गावच्या मातीसोबत नाळ जोडून मुंबई येथे उद्योग व्यवसायात उत्तम जम या चत्तर कुटुंबीयांनी बसविला आहे. बाळासाहेब चत्तर यांची मुलगी वैष्णवी बाळासाहेब चत्तर हिनी नुकतीच १२ विची परीक्षा दिली होती. एसआयईएस कॉलेज नेरूळ येथून वाणिज्य (कॉमर्स) विभागातून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होत तब्बल ९२ टक्के गुण मिळविले असून कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल बोलताना वैष्णवी हिने सांगितले की, माझ्या यशामागे आई - वडील व कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व माझ्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर मी हे यश संपादन केले आहे. 

      या यशाबद्दल वैष्णवी हीचे सर्वत्र कौतुक होत आहे. जी एस महानगर बँकेच्या संचालिका तथा अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका श्रीमती गीतांजलीताई शेळके, रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजनेचे चेअरमन तथा माजी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, माजी सरपंच लहू थोरात, माजी उपसरपंच संदीप काळे, दादाभाऊ बोरुडे सर, साई क्लिअरिंग अँड शिपिंग चे संचालक बाळासाहेब चत्तर, संजय चत्तर, विजय चत्तर आदींनी वैष्णवीचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments