सुदर्शन दरेकर / प्रतिनिधी
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बी. बी. ए. (सी. ए.) विभाग यांनी पीएचपी सीएमएस कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम द्रुपल अँड वर्डप्रेस या प्रोग्रामिंग भाषेमधील विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य लालासाहेब काशीद , महेश पवार, कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. रमेश हांडे, कॅपजेमिनी, टीम लीडर,पुणे उपस्थित होते. विशाल शिंदे यांनी आपल्या प्रास्तविकमध्ये कार्यशाळेची उद्दिष्ट व विभागामार्फत भविष्यात विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली .प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंगच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल व तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये याचा नक्कीच फायदा होईल याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळे दरम्यान रमेश हांडे यांनी द्रुपल आणि वर्डप्रेस या पीएचपी फ्रेमवर्कची तसेच कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम ची ओळख करून दिली, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये आणि व्यावहारिक अनुप्रयोगांचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. कार्यशाळेत द्रुपल आणि वर्डप्रेस यांची प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रोग्रामिंग प्रकल्पांमध्ये त्यांचा प्रभावीपणे वापर कसा करायचा इ. संबंधि विविध विषयांचा समावेश केला गेला होता. सदर कार्यशाळेस 89 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेला उपस्थित विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तसेच विद्यार्थ्यांना ती माहिती नाविन्यपूर्ण वाटली. कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. पुनम गुंजवटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या समारोप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सदर कार्यशाळेमुळे सीएमएस बद्दल नवनवीन माहिती मिळाली तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात त्याचा वापर करण्याबाबत आत्मविश्वास आला आहे अशी मते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमा शेख यांनी केले तर कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे आणि समारोपाचे आभार अनिल काळोखे यांनी मानले . कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी अक्षय भोसले, अक्षय शिंदे, वैशाली पेंढारकर ,कांचन खिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments