कर्डेलवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्यतपासणी

 ग्रामपंचायत कर्डेलवाडी आणि कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्डेलवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.महिला दिनाचे औचित्य साधून महिला आणि ग्रामस्थ यांच्यासाठी डॉ.अनमोल बोरकर यांच्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. नामांकित स्त्री रोग तज्ञ डॉ. हार्दे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचे व्याख्यान आयोजीत केले होते. डॉ.हार्दे मॅडम यांनी महिलांना रोजच्या जीवनात योग्य आहाराचे महत्व, व्यायाम, तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी पुस्तक वाचन,ध्यानधारणा या सवयी प्रत्येकाने आत्मसात केल्या पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या व्याख्यान दरम्यान संवादिनी ग्रुप मार्फत महिलांचे हकक विषयक भोंडला सादर करण्यात आला.


 

तसेच ग्रामपंचायत कर्डेलवाडी यांच्या सहकार्याने दंत चिकित्सक मार्फत दंत तपासणी करण्यात आली. 

तसेच ग्रामपंचायत कर्डेलवाडी मार्फत गावाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या महिलांचे सन्मान करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती चोभे मॅडम, अंगणवाडी सुपरवायझर देशमुख मॅडम यांनी स्त्री जन्माचे स्वागत म्हणून बेबी किट देऊन माता पालक आणि बाळाला सन्मानित केले . लेक योजनेबाबत जनजागृती केली. 

कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन संस्थेमार्फत महिलांसाठी संगीत खुर्ची,फुगे फोडणे,टिकली लावा या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . फिनिश सोसायटी संस्थेच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली. विजेत्या पहिल्या चार चार विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या दरम्यान महिलांसाठी फराळाचे नियोजन करण्यात आले होते.

जागतिक महिला दिन यशस्वी पणे पार पाडण्यासाठी विद्यमान ग्रामपंचायत महिला सरपंच सौ.लताताई गणेश कर्डिले, ग्रामसेवक श्री. शांताराम पाडळे, युवा कार्यकर्ते ऍडव्होकेट प्रवीण कर्डिले, तुषार दसगुडे, यांचे सहकार्य लाभले.

कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती रुपाली बोर्डे,ललिता पोळ,ज्ञानेश ब्राम्हणे,आकाश खटाटे,परमेश्वर साबे ग्रीश्मा सुपलकर तसेच ज्योती पारधी यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कर्डिले यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली बोर्डे यांनी केले.

Post a Comment

0 Comments