पारनेर प्रतिनिधी
इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परीक्षा अंतिम गुणपत्रकात विविध कला प्रकारांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळतात.शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ए श्रेणीला सात गुण बी श्रेणीला पाच गुण व सी श्रेणीला तीन गुण वाढीव गुण मिळतात. त्या अनुषंगाने नुकताच शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला.विद्यालयाचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल १०० टक्के व एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला. या दोन्ही परीक्षांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयाने घवघवीत यश मिळविले.
इंटरमिजिएट परीक्षेत सोबले साईश,वैद्य जिज्ञासा , पुजारी सार्थक,उदावंत गायत्री जेऊरकर समीक्षा व एलेमेंटरी परीक्षेमध्ये उदावंत श्रावणी,बढे सार्थक या विद्यार्थ्यांनी विशेष 'ए' श्रेणी प्राप्त केली
भालेराव आदित्य, ठाणगे रोहित,शिंदे वेदांत,औटी समर्थ,बोरगे तनुष, आढाव अनुज, इंगळे अदिती, औटी श्रृतिका, आढाव श्रावणी, सातपुते साक्षी, कावरे श्रद्धा, इथापे समृद्धी, मदने प्रतिक्षा, कुसळकर संस्कृती, सुंबे श्रृती, हारदे संस्कृती, आहेर निसर्गा, बढे साक्षी, भगत आकांक्षा, लगड तेजस्विनी, भिसे समिक्षा, ठुबे अस्मिता, गट समिक्षा, आंग्रे कृतिका, औटी श्रेया, भालेकर श्रेया,देशमुख गायत्री कडूस तनुजा, ठुबे दिव्या, वैद्य आर्यन या विद्यार्थ्यांनी बी श्रेणी प्राप्त केली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे,कल्पना नरसाळे,सुरेखा थोरात,संदीप पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले प्र.उपप्राचार्या मनीषा गाडगे,पर्यवेक्षक बाबासाहेब चौरे, प्र.पर्यवेक्षिका निर्मला सोबले तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक व अभिनंदन केले.

0 Comments