विकास पवार यांची लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयीन महसूल सहाय्यक पदी निवड
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील विकास गवराम पवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालयीन महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. शेतकरी पुत्राच्या या यशाबद्दल सर्वत्र पवार यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालयीन महसूल सहाय्यक अधिकारी पदाचा पेपर ३१ मे २०२३ ला घेतला होता. त्याचा निकाल २१ डिसेंबर २०२३ ला लागला असून त्यामध्ये अंतिम निवड झाली आहे. विकास पवार हे पिंपरी जलसेन येथील गवराम मारुती पवार या शेतकरी घराण्यातील पुत्र आहे. आई वडिलांनी शेतीत काबाडकष्ट करून मुलाला उच्चशिक्षित केले. विकास पवार यांच्या निवडीमुळे आई वडिलांच्या कष्टाला फळ आले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विकास पवार यांच्या निवडीबद्दल पिंपरी जलसेन येथील थोरात मळ्यात दत्तजयंती कार्यक्रमात आई वडिलांचा सत्कार झाला. त्याचबरोबर पिंपरी जलसेन गावातील नागरिकांनी, राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर. मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या.

0 Comments