पारनेर प्रतिनिधी
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय पुणे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर बुधवार दिनांक २७/१२/२०२३ ते रविवार दिनांक ३१/१२/२०२३ या कालावधीत मु. पो. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे आयोजित केले होते.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक २७/१२/२०२३ रोजी सकाळी दहा वाजता पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री निलेशजी लंके, पिंपळनेर गावचे सरपंच श्री. देवेंद्र लटांबळे, उपसरपंच सौ. छाया सुनील कळसकर, चेअरमन श्री. विकास दगडू रासकर, मा. उपसरपंच श्री हनुमंतराव गाडे, ग्रा.पं. सदस्य श्री बाळासाहेब गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती, सीईओ मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल शिरूर डॉ.अरविंद जैन सर, हेड एडमिन ऑपरेशन्स धारिवाल हॉस्पिटल शिरूर कु. वंदना सागवेकर मॅडम, फिनिक्स फार्माचे प्रो.प्रा. श्री बाबाजी गलांडे, तसेच सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.
यानंतर संत श्री. निळोबाराय महाराज मंदिर परिसरात ग्राम स्वच्छता करण्यात आली तसेच सायंकाळी शिबिरार्थी विद्यार्थ्यां मार्फत मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, दमा ई. आजाराविषयी समुपदेशन करण्यात आले, सायंकाळी ७:०० वाजता श्री अभिजीत पवार, पोलीस उपनिरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांचे दैनंदिन जीवनात कायद्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले.
गुरुवार दिनांक २८/१२/२०२३ रोजी सावता महाराज मंदिर चौकामध्ये डॉ. आकाश सोमवंशी, अस्थिरोग तज्ञ वेदांत हॉस्पिटल, शिरूर यांच्यामार्फत मोफत हाडांची तपासणी शिबिर तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले या शिबिराचा जवळपास ६५ ते ७० ग्रामस्थांनी लाभ घेतला औषधांसाठीचे सहकार्य श्री. बाबाजी गलांडे फिनिक्स फार्मा, श्री सचिन गाडे सचिन फार्मा, श्री पुष्पराज कोळपकर कालिका सर्जिकल्स आदी मान्यवरांनी केले, यानंतर संत निळोबाराय मंदिर परिसर तसेच स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता डॉ . हिरामण चोरे, चोरे हॉस्पिटल शिरूर यांचे आपत्कालीन वैद्यकीय सेवा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
शुक्रवार दिनांक २९/१२/२०२३ रोजी सावता महाराज मंदिर चौकामध्ये रुबी हॉल क्लिनिक संचलित मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल शिरूर यांचेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा जवळपास ७५ ते ८० ग्रामस्थांनी लाभ घेतला, सायंकाळी ७:०० वाजता डॉ. किरण चव्हाण, संचालक संवाद पुनर्वसन केंद्र यांचे सकारात्मक मानसिक आरोग्य आणि तणाव मुक्त जीवन या विषयावर व्याख्यान झाले.
शनिवार दिनांक ३०/१२/२०२३ रोजी बस स्टँड चौकामध्ये डॉ. अमोल पाटील, संस्थापक केमआरा प्रा. लि. अरन यांचे अल्प रासायनिक खतांमध्ये भरघोस उत्पादन या विषयावर शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन झाले. यानंतर पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी भेट घेतली व राळेगणसिद्धी मधील जनआंदोलन संग्रहालय व मीडिया सेंटर ई. बाबतीत माहिती घेतली. रात्री ८:०० वाजता श्री संपत कांदळकर सर, मुख्याध्यापक जि प. प्राथ. शाळा मिडगुलवाडी यांचे संमोहन शास्त्र या विषयावर व्याख्यान झाले.
रविवार दिनांक ३१/१२/२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर, प्रा. निखिल केदारी सर, कार्यक्रम अधिकारी श्री. विशाल कारखिले सर, पिंपळनेर येथील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्व शिबिरार्थी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना शिबिर काळात आलेले अनुभव सांगितले तसेच ग्रामस्थांनी अन्नदान, राहण्याची सोय ई. बाबतीत केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर यांनी व्यक्त केले.


0 Comments