रक्तदान शिबिर आयोजित करून अनेकांना जीवनदान देण्यात 'ग्रामसमृद्धी' निमित्त ठरतंय याचे मोठे समाधान - वाजे

 


पारनेर प्रतिनिधी

ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांत शेकडो लोकांनी रक्तदान केल्याने त्यातून हजारो रुग्णांना जीवनदान मिळाल्याचे मोठे समाधान असल्याचे मत ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ वाजे गुरुजी यांनी व्यक्त केले. गावात नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबवत संस्थेने आदर्श उभा केल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसमृद्धी फाऊंडेशनने रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या निमित्ताने बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 


शिक्षण, आरोग्य, पाणी आणि क्रीडा या महत्वाच्या विषयांवर ग्रामसमृद्धी फाऊंडेशन काम करणारी सेवाभावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. या शिबिरात तरुणांव्यतिरिक्त महिला आणि जेष्ठ नागरीकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. 

सदर शिबिरात सुनील नऱ्हे, नवनाथ वाजे, राम वायदंडे, राहुल बाबर, किरण नऱ्हे, महादू बोचरे, पंकज नऱ्हे, स्वप्नील चौधरी, वैभव पवार, गणेश जगदाळे, विकास वाजे, सविता वाजे, भागा बाबर, सुधीर पवार, गणेश चौधरी, रामदास चौधरी, दिगंबर वायदंडे, अभिजित वाजे, मंगेश पडवळ, अरुण चौधरी, दादाभाऊ चौधरी, गणेश दसगुडे, नमोली वाजे, किरण चौधरी, अजित वाजे, अमोल चौधरी, दत्ता चौधरी, सोपान येवले, शिवाजी पवार, सुभाष वाजे, ज्ञानदेव येवले, अनिता येवले, विक्रम चौधरी, अंकुश सुकाळे आदींनी रक्तदान केले. तर पंकज कारखिले, शिवाजी सुकाळे, लक्ष्मण बोऱ्हाडे, ज्ञानदेव बाबर, शिवाजी चौधरी, पांडुरंग पवार, कमल बोरुडे, नरेश सोनवणे, संतोष चौधरी, किसन चौधरी, गंगाराम पवार, गोरक्ष येवले, रमेश वाजे, अनिल नऱ्हे, संदीप चौधरी, अशोक वाजे, देठे सर, जगदाळे सर, विकास येवले, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामसमृद्धीचे विकास वाजे, योगेश पवार, महेश बोचरे, सोपान येवले, विक्रम वाजे, गणेश येवले, अजित वाजे, जितेंद्र बोचरे, किरण नऱ्हे, अरुण चौधरी, निलेश बाबर, नवनाथ नऱ्हे, गणेश कटारिया, सुधीर पवार, उत्तम बाबर, नवनाथ बोऱ्हाडे, जया बोऱ्हाडे, सुनील नऱ्हे, हरीश नरवडे, लक्ष्मण गायकवाड, संदीप येवले, शंकर खुपटे, नवनाथ नऱ्हे, गणेश जगदाळे, सहादू येवले, सचिन बाबर, योगेश चौधरी, राहुल नऱ्हे, राम वायदंडे, महेश नऱ्हे, लहू बोचरे, नवनाथ वाजे, गोरक्ष सुकाळे, दत्तात्रय वाजे, विकास येवले, दत्तात्रय शेटे, गणेश बाबर, दत्ता सुकाळे, सागर जगदाळे, ज्ञानदेव येवले, दत्तात्रय येवले, अनिल जगदाळे, ठखाराम थोरात, उत्तम निचित, सचिन जगताप, केतन जगदाळे, गणेश बाबर, किरण चौधरी, दादाभाऊ चौधरी, राहुल बाबर व लहू शेटे यांनी परिश्रम घेतले. रुबी हॉल क्लिनिकच्या रक्तपेढीने सदर शिबिरात रक्तसंकलन केले.



आणि दोन रुगांना तातडीने मिळाले रक्त

सदर शिबिर चालू असताना हॉस्पिटल मधून फोन आला असता समजलं की दोन रूग्नांची हृदय शस्त्रक्रिया नियोजित असल्याने O-ve आणि B-ve गटाचे रक्त हवे आहे. योगायोगाने या शिबिरात तीन जणांचे रक्तगट जुळल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार असल्याने ग्रामसमृद्धीचे अध्यक्ष विकास वाजे यांनी समाधान व्यक्त करून शिबीर सफल झाल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments