विद्यार्थ्यांच्या कला व इतिहास ज्ञानाला चालना देणारा उपक्रम-रायचंद गुंड
शिवबा संघटना-दुर्गसंवर्धन परिवार आयोजित किल्ले बनवा भव्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
प्रथम क्रमांक साहिल लंके सिंहगड (कोंढाणा) किल्ले प्रतिकृती,द्वितीय क्रमांक अभिषेक बोराडे मुरुड जंजिरा जलदुर्ग प्रतिकृती,तृतीय क्रमांक साई लंके पन्हाळगड किल्ले प्रतिकृती,चतुर्थ क्रमांक साई राऊत मुरुड जंजिरा प्रतिकृती,पाचवा क्रमांक ईश्वरी जठार प्रतापगड किल्ले प्रतिकृती,खास लक्षवेधी बाल किल्लेदार स्वराज्य इरोळे-मुरुड जंजिरा जगदुर्ग प्रतिकृती.या विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवली. स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रल्हाद दगडू सोनार,धुळे व प्रा.चतुर्भुज विनायक शिंदे नंदुरबार यांनी ऑनलाइन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रम समिती प्रमुख कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवबा दुर्गसंवर्धन परिवाराचे सचिव तथा उद्योजक रायचंद गुंड यांनी सांगितले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल ज्ञान जागृती होऊन त्यांच्यामध्ये पुढील आयुष्यासाठी प्रेरणा मिळते आणि म्हणूनच असे सामाजिक उपक्रम शिवबा दुर्गसंवर्धन परिवार आयोजित करते याचा आनंद वाटतो.यानिमित्ताने प्रमुख उपस्थिती शिवबा दुर्गसंवर्धन परिवार संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांनी पुढील वर्षी किल्ले बनवा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना गड-किल्ल्यांची मोफत सहल घडविण्याचे जाहीर केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार दत्ताशेठ उनवणे ,शिवबा संघटना तालुका अध्यक्ष बबनशेठ तनपुरे,दुर्ग संवर्धन परिवार उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी,पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी ईश्वरी जठार, उपक्रम समिती सदस्य राजूशेठ लंके,पत्रकार भास्करशेठ कवाद प्रा. भरत डोके सर यांनी मनोगते व्यक्त केली. शिवबा दुर्गसंवर्धन परिवार अध्यक्ष राजूभाऊ लाळगे यांनी सर्वांचे आभार मानले. उपक्रम समिती उपाध्यक्ष शिवव्याख्याते ज्ञानेश्वर कवाद यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार संदीप इधाटे,लहू इरोळे, तानाजी बोराडे, दिलीप लंके तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थी पालक यानिमित्ताने उपस्थित होते.

0 Comments