ह भ प जालिंदर महाराज साळुंखे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता
चंद्रकांत कदम प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे श्री गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री गोरक्षनाथ प्रगट दिनानिमित्त शनिवार १८ नोव्हेंबर ते शनिवार 25 नोव्हेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत ज्ञानेश्वर कथेचे सात दिवस ह भ प जालिंदर महाराज साळुंखे यांच्या मधुर वाणीतून कथा सादर करण्यात आली. आज शनिवारी ह भ प जालिंदर महाराज साळुंखे यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्री गोरक्षनाथ प्रगट दिन व सप्ताहाची सांगता करण्यात आली. ह भ प तात्या महाराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री संत ज्ञानेश्वर यांच्या कथेदरम्यान "झाकी दर्शनाच्या" माध्यमातून सर्व पात्रांचे सादरीकरण करण्यात आले. झाकी दर्शनाने उपस्थित त्यांची मने जिंकली. ह भ प तात्या महाराज काटकर यांच्या ६१ वी निमित्त बुधवार दिनांक २२ रोजी ह भ प ऋषिकेश महाराज नवले यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तर आज शनिवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प जालिंदर महाराज साळुंखे यांचे काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व नाथ भक्त व भाविकांनी सहकार्य केले.


0 Comments