पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

 पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन तालुका पारनेर येथील कु. सोहम विजय पठारे याची नवोदय विद्यालयाच्या  यादी मध्ये निवड झाली सन 2022 23 च्या निवड यादीमध्ये शाळेच्या यापूर्वी चार विद्यार्थ्यांची निवड झाली होती प्रतीक्षा यादी मध्ये या शाळेच्या पाचवा विद्यार्थी सोहम ची निवड झाली यावेळी अहमदनगर जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेमध्ये श्रीमती गीतांजलीताई शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. असून जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन ची आहे या विद्यार्थ्यांना शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री सतीश भालेकर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले शाळेच्या सर्वच शिक्षकांनी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली त्याच्या या यशाचे परिसरात कौतुक होत असून त्याचे पालक व शिक्षक यांचे आमदार श्री.निलेशजी लंके साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी श्री लाळगे साहेब, केंद्रप्रमुख श्री येवले साहेब शाळेचे मुख्याध्यापक श्री देवराम पिंपरकर सर, तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालिका श्रीमती गीतांजलीताई शेळके,  अहमदनगर जिल्हा बँकेचे पारनेर शाखेचे शाखाप्रमुख श्री लाळगे साहेब, प्रा. सुरेखाताई थोरात,  पिंप्री जलसेनचे सरपंच श्री सुरेश काळे, व लोणी मावळा गावचे सरपंच श्री विलासराव शेंडकर, डॉ.सुभाष मावळे, तसेच वाळवणी गावचे सरपंच श्री गोरक्ष दरेकर, सचिनशेठ पठारे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री नितीनशेठ पठारे, गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments