दत्तकृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल अडसरे यांची बिनविरोध

 दत्तकृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल अडसरे यांची बिनविरोध निवड

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील श्री दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विठ्ठल यादव अडसरे यांची तर व्हा. चेअरमनपदी शब्बिरभाई इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


        श्री दत्तकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी वाघमोडे यांच्या अध्यक्षेखालील कै. सॉ. गुलाबराव शेळके साहेब सभागृहामध्ये चेअरमन व व्हा चेअरमन निवडणूक घेण्यात आली. यामध्ये चेअरमन पदी विठ्ठल यादव अडसरे व व्हा. चेअरमनपदी शब्बीरभाई इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी  लहू भागूजी थोरात, सोपान देवराम मते, संपत शेंडकर, आनंदा रणदिवे, रामदास काशिनाथ शेळके, ज्ञानदेव सबाजी वाढवणे, सईद शेख, सुमन दादाभाऊ कदम, नंदा काशिनाथ घेमुड आदी संचालकांच्या उपस्थितीत ह्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.


     नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल अडसरे व व्हा चेअरमन शब्बीरभाई इनामदार यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेश काळे, माजी सरपंच भास्कर शेळके, ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू थोरात, लक्ष्मण बोरुडे, अप्पासाहेब शेळके, गंगाराम काळे, साहेबराव शेळके, माजी संचालक दादाभाऊ कदम, माजी ग्रा प सदस्य यशवंत अडसरे, दत्तात्रय थोरात, कारभारी पुजारी, धनाजी थोरात, दगडु बोरुडे, माऊली थोरात, भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

      

सर्व संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेऊन बिनविरोध चेअरमनपदी माझी निवड करून माझी जबाबदारी वाढवली आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन यापुढे कामकाज करत असताना सर्वसामान्य नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावत संस्थेची प्रगती करण्यावर माझा भार राहील.

(नवनिर्वाचित चेअरमन विठ्ठल अडसरे)

Post a Comment

0 Comments