मराठा आरक्षणासाठी मनोज तामखडे यांचा गांजोभोयरे सेवा संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा

 मराठा आरक्षणासाठी मनोज तामखडे यांचा गांजोभोयरे सेवा संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा


पारनेर प्रतिनिधी

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असून अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मराठा आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून त्यांची प्रकृती खालवली असून त्यांची उपचारास नकार दिला आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून आरक्षण देणे गरजेचे असून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आनेक गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी घातली आहे. पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील सेवा संस्थेचे संचालक मनोज तामखडे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा संस्थेचे चेअरमन यांच्याकडे दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याने सरकार कडून आरक्षण देण्यात येत नसल्याने मी राजीनामा देत असल्याचे मनोज तामखडे यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.



दरम्यान, मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहे. विशेषत: बीडमध्ये आंदोलन उग्र बनलं आहे. सरकारने जवळपास साडे अकरा हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी केलीये. पण, तुर्तास आंदोलन थांबण्याची चिन्ह नाहीत. महाराष्ट्रतील अनेक राजकीय पुढारी आमदार, खासदार, सरपंच, सेवा संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देत असून सरकारवर दबावतांत्र निर्माण करत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

 

सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तातडीने सरसकट मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे. अन्यथा यापुढील काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मराठा आंदोलनाला पाठींबा म्हणून मी माझ्या सेवा संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा देत आहे. आता मराठ्यांची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. मनोज तामखडे (संचालक सेवा संस्था गांजिभोयारे ता - पारनेर)

Post a Comment

0 Comments