मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गांजिभोयारे येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण
मराठा बांधवांसह इतर जातीधर्मातील बांधवांचा उपोषणास पाठींबा
पारनेर प्रतिनिधी :
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मागितलेली ४० दिवसांची मुदत संपली असून अद्याप आरक्षण न मिळाल्याने मराठा आरक्षण नेते मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. ते त्यांच्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले आहे. राज्यात आता पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनाचा ज्वर वाढत आहे. पाटील यांच्या या आंदोलनाला विविध ठिकाणावरून मोठा पाठिंबा मिळत आहे. पारनेर तालुक्यातील जवळा, पोखरी, देसवडे, सिद्धेश्वरवाडी या गावांमध्ये आता राजकीय कार्यक्रम घेण्यास व राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील मराठा समाज आता एकवटला आहे. शुक्रवारी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पारनेर या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले.
तालुक्यातील गांजीभोयरे येथे शिवबा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण आज शनिवार सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. या एक दिवसीय उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. एक मराठा लाख मराठा या घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
यावेळी बाबासाहेब खोडदे, शांताराम पाडळे, आयुब इनामदार, प्रदीप खणसे, अक्षय माने, रावसाहेब झंजाड, राजू खोडदे, गणेश खणसे, मनोज तामखडे, गोरख खो, रमेश भंडारी, आनंदा पांढरे, मोहन शिंदे, संजय पांढरे, उत्तम पांढरे, महबूब शेख, विश्वास खोडदे, प्रशांत खोडदे, शहाजी तामखडे, ऋतिक खोडदे, अक्षय झंजाड, ज्ञानदेव खोडदे, शिवाजी झंजाड,सुभाष निमोनकर,तन्मय खणसे, सागर म्हस्के, मुबारक शेख, अमोल निंबाळकर, दादाभाऊ पांढरे, श्रीकांत खोडदे, सुभाष निमोणकर, प्रताप चत्तर,भरत पांढरे, ठकाराम खोडदे, निलेश निंबाळकर आदींनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास पाठींबा दिला.
राज्यात मराठा समाजाची संख्या जास्त आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला राज्य शासनाने सर्वसमावेशक आरक्षण आता द्यावे. मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवबा संघटना व गांधी ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येत आहे. मनोज तामखडे(समन्वयक : सकल मराठा समाज, पारनेर)

0 Comments