बोलघेवड्या अपयशी सरकारला घरी बसवा- तालुका प्रमुख डॉ.पठारे
मोदी-शाह एकतर्फी निर्णय घेतात ; डॉ.पठारे यांचे सरकारवर टीकास्त्र.
प्रतिनिधी- महेश शिंगोटे.
राज्याचे मा.मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पारनेरच्या वतीने संपूर्ण तालुक्यात भाजप सरकारने केंद्रात व युती सरकारने राज्यात ज्या बोलघेवड्या योजना राबविल्या आहेत.त्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत.राज्यात वाढलेली महागाई,बेरोजगारी ढासाळलेली अर्थव्यवस्था,आरक्षण स्रियावरील आत्यचार,शेतकरी बांधव इतर अनेक मुद्दे घेवून विजय औटी हे स्वतः तालुका प्रमुख डॉ.पठारे,रामदास भोसले यांना सोबत घेवून सर्वसामान्य जनतेत जाऊन भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पडात आहे.
विजय औटी हे आपल्या सहकाऱ्यांसोबत संपूर्ण पारनेर तालुका पिंजून काढत आहेत.
कान्हूर पठार गटात आज प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख डॉ.पठारे म्हणाले की,२०१४ मध्ये काँग्रेस सरकार जनतेने उलथून टाकले त्यानंतर सर्वसामान्य जनतेला अपेक्षा होत्या आपल्याला आता अच्छे दिन येतील.सर्वांचे चांगले होईल शिक्षण आरोग्य,व्यापार,उद्योग,शेतकरी यांना चांगले दिवस येतील.महागाई नियंत्रणात येईल.माझ्या माता भगिंनिंवरील अन्याय अत्याचार कमी होतील. पण यातील काही झालंय का...?
डिझेल पेट्रोल चे भाव दुप्पट झालेत गॅस चे दर वाढलेत. शेतकरी वर्ग निराश झाला आहे.आपल्याला वाटत होत चांगल होईल पण आता भाजपने जनतेचा भ्रमनिरास करून वाटोळं केलं आहे.
म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हा भाजपचा बोलघेवडे खोटारडे पणा जनतेसमोर आणण्याचे ठरवंल आहे.सगळीकडे अंधकार झाला आहे.कुठल्याच पातळीवर हे सरकार यशस्वी झालेलं नाही.हे वातावरण सर्वांसाठी धोकादायक आहे.शिक्षण,आरोग्य यांचे वाभाडे निघले आहेत,आरोग्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन अभावी 35 ते 40 रुग्णांचा मृत्यु झाला.तुम्ही मूलभूत सेवा जनतेला देणार नसालं तर तुम्हाला काय अधिकार आहे खुर्चीवर बसण्याचा...?या सरकार ला राज्य करण्याचा कुठलही आधिकर नाही.रात्रीतून दोन दोन उपमुख्यमंत्री बनवतात पण लोकांसाठी काही करायचं म्हणल्या वर यांच्या जीवावर येतं.अस हे नाकर्ते सरकार 2024 ला आपल्याला घरी बसवायचं आहे.मोदी आणि शाह हे एकतर्फी निर्णय घेतात.कोणी सत्याच्या बाजूने आवाज उठवला तर त्यांच्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करतात.असे खडेबोल मोदी सरकार ला सुनावले.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले,युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे,दादाभाऊ येणारे,गुलाबराव नवले आदींसह शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments