गावच्या पाणी योजनेच्या कामासाठी गावकऱ्यांचे योगदान महत्वाचे - अनिल वाढवणे साहेब

 गावच्या पाणी योजनेच्या कामासाठी गावकऱ्यांचे योगदान महत्वाचे - अनिल वाढवणे साहेब

चंद्रकांत कदम | पिंपरी जलसेन

पिंपरी जलसेन मधील नागरिकांचा व शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांचे योगदान गरजेचे असल्याचे मत पिंपरी जलसेनचे सुपुत्र व माजी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे साहेब यांनी व्यक्त केले आहे. श्री रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजनेची बैठक पिंपरी जलसेन येथे वाढवणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


        पिंपरी जलसेन हा कुकडी कालव्यापासून ५ किमी अंतरावर असलेले गाव असल्याने कूकडी कालव्याच्या प्रवाही पाण्याचा उपयोग या गावाला होत नसल्याने महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉ. गुलाबराव शेळके साहेबांनी १९८८-८९ मध्ये पिंपरी जलसेन ला श्री रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजना सुरू केली. या योजेअंतर्गत निघोज हद्दीतील कुकडि कालव्यातून पाणी उपसा सिंचन द्वारे पिंपरी येथील शेतकऱ्यांना देत होते. मध्यंतरीच्या कालखंडात ही योजना बंद झाल्यानंतर २०११ मध्ये पिंपरी जलसेनचे सुपुत्र व तत्कालीन गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे साहेब यांनी ही योजना पुनर्जीवित केली व २०१५ मध्ये प्रत्यक्षात योजना सुरू होऊन ग्रामस्थांना पुन्हा पाणी येऊन योजनेचा लाभ सुरू झाला. या योजनेला कृषी दराने महावितरणने वीजबिल न आकारता औद्योगिक दराने आकरल्याणे पुन्हा वीजबिल सुमारे १२ लाखापर्यंत गेल्याने पारनरचे तत्कालीन आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या माध्यमातून औद्योगिक दराचे वीजबिल कमी करून ते कृषी दराने करण्यात आले. १२ लाखांचे वीजबिल कमी होऊन ते दीड लाखापर्यंत आले. तेव्हापासून योजना कार्यान्वित आहे. सध्या राज्यशासनकडून सोलर प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून सुमारे अडीच कोटी रुपयांची ही योजना आहे. लवकरच हा प्रकलप झाल्यानंतर पूर्ण दाबाने पूर्णवेळ पाणी गावासाठी मिळणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

     


सध्या या योजनेचा वापर शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी देखील होत असल्याने शेतकऱ्यांसह गावातील सर्वच ग्रामस्थांनी या योजनेला स्वईछेने आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन वाढवणे साहेब यांनी केले आहे. 

यावेळी गावातील सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, माजी सरपंच लहू थोरात, माजी सरपंच भास्कर शेळके यांसह ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे संचालक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या योजनेसाठी वर्गणी रूपाने भरघोस आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments