सत्ता नसताना विकासासाठी सुजित झावरे प्रयत्नशील - आझाद ठुबे

 सत्ता नसताना विकासासाठी सुजित झावरे प्रयत्नशील - आझाद ठुबे

करंदी येथे मळगंगा देवी मंदिर प्रसादलयाचे भूमिपूजन

झावरे ठुबेंचे सुत जुळले ?


प्रतिनिधी महेश शिंगोटे.


 करंदी येथे मळगंगा मंदिर प्रसादलयाचे भूमिपूजन समारंभ जिल्हापरिषदेचे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या शुभहस्ते पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद भाऊ ठुबे हे होते.



राजकारण व समाजकारण करत असताना तालुक्यात विकास कामांत सुजित झावरे हे नेहमी अग्रेसर असतात.त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना देखील झावरे हे विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक विकासकामे मार्गी लावत आहेत.त्यामुळे झावरे यांचे संघटन मजबूत टिकून आहे.हीच त्यांची जमेची बाजू आहे.असे मत आझाद ठुबे यांनी मांडले.

बोलताना सुजित झावरे म्हणाले की,पूर्वी मा.आमदार वसंतराव झावरे आणि मा.आमदार बाबासाहेब ठुबे यांनी एकमेकांच्या विरोधात राजकारण केलं.परंतु राजकारण करत असताना त्यांच्यात कधी व्यक्तिदोष आढळला नाही.त्यांच्यात मतभेद होते पण मनभेद कधीच दिसले नाहीत.

आता राजकारणाची दिशाच बदलली आहे.त्यावेळी.राजकारण हे चौकटीत व संस्कारक्षम होते.असे मत मा. जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.

प्रसंगी अरुणराव ठाणगे,बाळासाहेब रेपाळे,सतिश पिंपरकर,संदीप घोडके,साहेबराव नरसाळे,सरपंच नंदा गव्हाणे,उपसरपंच अर्जुन ठाणगे चेअरमन प्रकाश ठाणगे आदींसह ग्रामसेवक सेक्सपियर व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments