पारनेर तालुक्यात धुमाकूळ घालणा-या चोरट्यांचा पारनेर पोलीसांनी केला पर्दाफाश
५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
पारनेर प्रतिनिधी
पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी व घरफोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. श्री. संपतराव भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांनी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड सो, यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून असे गुन्हे करण्या-या लोकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अशा प्रकारचे गुन्हे करणारे चोरट्यांचा पोलीस पथक शोध घेत असताना काही लोक महिंद्रा कॅरी गाडीचा वापर करून चो-या करत असल्याची माहिती प्राप्त झाली. दिनांक- 19/09/2023 रोजी पहाटे चोरट्यांनी हकीकतपूर, राळेगण थेरपाळ येथील हनुमान मंदिरातून अम्प्लिफायर मशीन, बॅटरी, साऊंड बॉक्स, माईक इत्यादी वस्तू चोरून नेल्याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला दाखल गु.र.नं. 915/2023 भा.द.वि.क 457, 380, 34 या गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस पथकास सदरच्या गुन्ह्यात महिंद्रा कॅरी गाडीचा वापर केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा प्रणव भारत चव्हाण, वय 20 वर्षे, रा. खामकर झाप, ता. पारनेर याने त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने मा. पोलीस निरीक्षक सो, यांनी त्यांचे अधिनस्थ अधिकारी व अंमलदार यांना त्याचेवर छापा घालून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने सादर आरोपीचा त्याचे राहते घरी जाऊन छापा घालून त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत व त्याचे साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबूली देऊन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे चार अल्पवयीन साथीदारांचे मदतीने केल्याची माहिती दिल्याने त्याचेसह त्यातील एका अल्पवयीन साथिदाराचे घरी जाऊन खात्री केली असता त्याचे घरी गुन्ह्यातील वस्तू मिळून आल्या. त्या जप्त केल्यावर त्याचे घरासमोर आणखी वस्तू मिळून आल्याने त्यास पालकांसमक्ष विचारपूस केली असता सदर अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याचे तीन अल्पवयीन साथिदारांचे मदतीने पारनेर तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पानोली, राळेगण सिद्धी, जामगाव, भाळवणी, गाजदीपूर, कान्हूर पठार तसेच ईतर ठिकाणी कॅरी गाडीचे सहाय्याने जाऊन चो-या केल्या असून त्यातील वस्तू त्याने सांगितल्याप्रमाणे जप्त केल्या असून त्यामध्ये एकूण 08 चो-या, 01 घरफोड्याचे असे एकूण 09 गुन्हे उघड झाले असून त्यांचेकडून एकूण 5,70,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर श्री. संपतराव भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पो.ना. गहिणीनाथ यादव, गोरख गायकवाड, पो.कॉ. विवेक दळवी, सारंग बाघ, सागर धुमाळ, पोपट मोकाते, मच्छिंद्र खेमनर, रविंद्र साठे, शाम गुजर, चालक किसनराव औटी, होम, वैभव पांढरे, अभिजीत जाधव यांनी केली आहे. सोबत - जप्त केलेल्या मुद्देमालाची यादी सादर केली आहे. पारनेर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे.

0 Comments