सहायक निबंधक पारनेर बाजार समितीवर मेहेरबान ; पारनेर परिवर्तन फाउंडेनचा आरोप

 सहायक निबंधक पारनेर बाजार समितीवर मेहेरबान ; पारनेर परिवर्तन फाउंडेशनचा आरोप

परिवर्तन फाउंडेशन उपोषणावर ठाम



पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि परिवर्तन फाउंडेशन यांच्यामधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अनेकदा चर्चा निवेदन मागण्या आणि इशारे दिल्यानंतरही बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारे लेखी लेखी स्पष्टीकरण दिले गेले नाही त्यामुळेच पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनने शेतकऱ्यांसाठी केलेल्या  मागण्यांबाबत उपोषणाच्या आंदोलनाचा इशारा दिला होता आज पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनने जाहीर केले की आता चर्चेची दारे बंद झाली आहेत आणि आता उपोषण हाच शेवटचा पर्याय असून याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठवले गेले आणि बाजार समितीमध्ये होत असलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची  मागणी केली गेली.



पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडता, तोलाई, भराई ,हमाली आणि इतर कपात केली जाण्याची जी पारंपारिक पद्धत आहे त्या पद्धतीला छेद देत ही शेतकऱ्यांची लुटमार आहे अशा पद्धतीने परिवर्तने भूमिका घेतली, आणि त्याबाबत तक्रारी दाखल केल्या .

बाजार समितीने मात्र व्यापाऱ्यांना थातूरमातूर नोटीस काढत काढता न कापण्याबाबत सूचना दिल्या परंतु त्यानंतर देखील परिवर्तन च्या सदस्यांना बाजार समितीमध्ये कडता कापल्याचे पुरावे मिळाले. म्हणूनच शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजार समितीने ज्या व्यापाऱ्यांनी कडता कापला त्या व्यापाऱ्यांवरती तातडीने गुन्हे दाखल करावेत याबाबत पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशनने मागणी केली ,परंतु व्यापाऱ्यांना फक्त सात दिवसात खुलासा करण्यासाठी पत्रव्यवहार बाजार समितीने करून पुन्हा एकदा तोच कागद फिरवण्याचा उद्योग सुरू केला आणि हा सगळा प्रकार पाहता परिवर्तन ने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत कोणत्याही प्रकारे माघार न घेता दोन ऑक्टोबर गांधी जयंती पासून उपोषण होणार असे जाहीर केले आहे.

त्याचबरोबर हे उपोषण होऊ नये म्हणून परिवर्तन च्या काही सदस्यांनी मार्केट कमिटी मध्ये आम्हाला जागा द्यावी अशी मागणी केल्याचे खोटे वृत्त हे बाजार समितीच्या काही संचालकांकडून जाणून-बुजून परिवर्तनला बदनाम करण्यासाठी केले जात आहे परंतु या कोणत्याही गोष्टीचा काहीही उपयोग होणार नाही, आमच्या नऊ मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण आंदोलन थांबवणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय परिवर्तन फाउंडेशन शांत बसणार नाही असे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी जाहीर केली.


आता चर्चा बाजार समिती सोबत नाही तर आता चर्चा महाराष्ट्र शासनासोबत अशी ही भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली परिवर्तनाच्या मुख्य मागण्यांमध्ये कडता , तोलाई, भराई ,हमाली,बंद करून तातडीने तशा प्रकारचा फलक हा बाजार समितीच्या मुख्य द्वारावरती लावावा.लाल गोणी मधला कांदा हा बाजारभावाप्रमाणेच घेतला जावा, त्यामध्ये केली जाणारी एक रुपयाची कपात तातडीने बंद करावी.शेतकऱ्याने शेतीमाल गोणी मध्ये आणल्यानंतर गोणीचे पैसे परत द्यावेत, किंवा गोणीला गोणी परत द्यावी.ज्या ज्या व्यापाऱ्यांबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या व्यापाऱ्यांचे परवाने तातडीने रद्द करून या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे दुप्पट भावाने भरपाई करून घ्यावी. तसेच या व्यापाऱ्यांचे या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत.मागील दहा वर्षांमध्ये पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालेल्या कांद्याच्या गोण्यांच्या संख्येनुसार प्रत्येक व्यापाऱ्याकडून जो आज पर्यंत कापलेला कडता आणि इतर कपात याचे लेखापरीक्षण करून आजच्या बाजारभावाच्या दुप्पट बाजारभावाने वसुली करावी.


कृषी उत्पन्न बाजार समितीने उपबाजार समिती टाकळी ढोकेश्वर तसेच उप बाजार समिती निघोज यासाठी जागा खरेदी केल्या परंतु या जागांमध्ये उच्च मोलाच्या जागा या काही संचालकांच्या घशात घातल्या गेल्या आणि त्या बदल्यांमध्ये मातीमोल भावाच्या जागा मार्केट कमिटीच्या गळ्यात मारल्या गेल्या. या संपूर्ण खरेदी-खतांची चौकशी दुय्यम निबंधकांच्या समितीमार्फत व्हावी अशी मागणी पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन ने केली आहे.


तसेच उपोषणापूर्वी अजून दोन मागण्या या पुरवणी मागण्या म्हणून मार्केट कमिटीकडे सादर केल्या जातील आणि त्यातील मुख्य मागणी म्हणजे मार्केट कमिटी मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या नोकर भरतीची सुद्धा चौकशी करावी तसेच मागील सहा वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांची सुद्धा मुख्या अभियंता महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आणि यांच्या निर्देशानुसार चौकशी करून भ्रष्टाचार झाला असल्यास दोशींवरती कारवाई करावी.या दोन जास्तीच्या मागण्या देखील परिवर्तन त्यांच्या नऊ मागण्यांच्या यादीमध्ये सामील करत असल्याचे परिवर्तन ने जाहीर केले.


पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव तसेच सर्व राजकीय पक्षांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि प्रत्यक्ष उपोषण स्थळी हजर राहून परिवर्तन ला या शेतकरी हिताच्या कामांमध्ये साथ द्यावी अशी विनंती परिवर्तन चे कार्याध्यक्ष सुहास सदाशिवराव शेळके यांनी केली.


व्यापाऱ्यांबाबतच्या तक्रारी या दुय्यम निबंधकांना सुद्धा दिलेले आहेत वास्तविक पाहता दुय्यम निबंधकांना तक्रार मिळाल्यानंतर त्या तक्रारी वरती तातडीने कार्यवाही करत दुय्यम निबंधकांनी संचालकांवरती तसेच चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु पारनेरचे दुय्यम निबंधक हे मार्केट कमिटी वरती मेहरबान असल्यामुळे ते कारवाईस मात्र टाळाटाळ करत असल्याचे सुद्धा सचिन भालेकर यांनी नमूद केले

Post a Comment

0 Comments