पिंपरी जलसेनमध्ये श्रीकृष्ण जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

 पिंपरी जलसेनमध्ये श्रीकृष्ण जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राणपतिस्थापणा


पिंपरी जलसेन

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त पिंपरी जलसेन येथे ३ दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

     मंगळवार (दि.५) ते गुरुवार (दि.७)  पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह होणार असून यामध्ये ह.भ.प भाऊसाहेब महाराज गट, श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन ह.भ.प गणेश महाराज शेंडे व काल्याचे कीर्तन ह.भ.प प्रेमानंद महाराज आंबेकर तर प्रवचन ह भ प पवन महाराज तनपुरे व ह भ प विठ्ठल महाराज निचित यांचे होणार आहे. मंगळवारी व बुधवारी होमहवन करून श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments