मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा पिंपरी जलसेन मध्ये निषेध गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी केला निषेध
पारनेर
![]() |
| मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना पिंपरी जलसेन मधील ग्रामस्थ . (छाया- चंद्रकांत कदम) |
जालना येथे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचाराने व गोळीबार आणि अश्रू धुरामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. प्रशासनाने केलेल्या चुकीच्या लाठीचारामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे सोमवारी सकाळी गाव बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाचे महत्त्व पटवून देत जालना येथे झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच कैलास घेमुड, संतोष परांडे, पत्रकार चंद्रकांत कदम, शैलेश सोनवणे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच भास्कर शेळके, रेवजी कदम, धनाजी थोरात, आश्रफ शेख, राजेंद्र थोरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेळके, साहेबराव शेळके, गणेश काळे, अक्षय बोरुडे, गणेश पुणेकर, काशिनाथ घेमूड आदींसह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत गावातील दुकाने व सर्व व्यवहार बंद ठेवत ग्रामस्थांनी देखील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0 Comments