दत्ता गाडगे यांना "राज्यस्तरीय शिवतेज विकास पत्रकारीता पुरस्कार जाहीर..
आमदार निलेश लंके यांचे हस्ते आज पुरस्कार वितरण..
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील शिवतेज मित्रमंडळ बाभूळवाडे यांचे वतीने देण्यात येणारा, " राज्यस्तरीय शिवतेज विकास पत्रकारीता पुरस्कार २०२३ " हा पुरस्कार सुरु झाला असुन,हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव दत्तात्रय जगन्नाथ गाडगेसर यांना जाहीर झाला आहे.
यावर्षी पासुन या पुरस्कार वितरणाला सुरवात होत आहे.दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील एका व्यक्तीची निवड या पुरस्कारासाठी केली जाईल अशी माहीती शिवतेज मित्रमंडळाचे संस्थापक अॅड.कृष्णाजी जगदाळे यांनी दिली.हा पुरस्कार पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार
लोकनेते निलेश लंके यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असुन,सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,हे असणार आहेत.
आज सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता या पहील्या पुरस्काराचे वितरण होणार आहे.जेष्ठ पत्रकार दत्ता गाडगे यांना यापूर्वी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचा " राज्यस्तरीय एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार २०२२" तसेच दैनिक पुढारीचा स्टार रिपोर्टर पुरस्कार मिळाला आहे.तसेच आजपर्यंत विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
पत्रकारीता क्षेत्रामधे त्यांनी सचोटी व प्रामाणिकपणा जपला,तसेच निर्भिड पत्रकारीता केली.तसेच पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर नेहमीच आवाज उठविला,त्यांच्या बातमीदारीमुळे सर्वसामान्य लोकांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळाला.पत्रकारिता क्षेत्रामधे प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीयामधे एक मोठे काम त्यांनी केलेले आहे.त्यांनी लिहलेल्या अनेक स्टोरीजला लाखामधे लोकांनी पाहीले आहे.
दत्ता गाडगे यांनी अनेक चॅनलला संपादक,विभागीय संपादक, ब्युरोचिफ म्हणुन काम केले तसेच,दैनिक पुढारी,राष्ट्र सह्याद्री, गांवकरी,प्रभात अशा वृत्तपत्रांना गेली १६ वर्ष काम केले आहे.त्यांच्या कार्याची दगल घेत त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.
तसेच, शिवतेज गणेश फेस्टीवल मधे," राज्यस्तरीय शिवतेज विकास पत्रकारीता पुरस्कार २०२३ ", पत्रकार सन्मान सोहळा,१०० शालेय विद्यार्थ्यांना दप्तरवाटप,शिवतेज महीला महालक्ष्मी उद्योग प्रकल्पाचा शुभारंभ,शिवतेज माहेरची साडी वाटप कार्यक्रम,उत्सव काळामधे झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने उपस्थित रहावे,तसेच मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक ९ वाजता " महाराष्ट्राची लोकधारा मुंबई " यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.याही कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप बोरुडे,कार्यवाह अजिंक्यराज जगदाळे,कार्याध्यक्ष जुबेर पठाण यांनी केले आहे.

0 Comments