राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी कायम उभा.

 राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी कायम उभा - जिल्हा सचिव दत्ता गाडगे.


निघोज येथे पत्रकार महेश शिंगोटे यांचा वाढदिवस  साजरा.



 निघोज - मायभूमी न्यूजचे कार्यकारी संपादक व  राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य महेश शिंगोटे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

   यावेळी बोलताना राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे सर म्हणाले की ,राज्य मराठी पत्रकार संघ हा प्रत्येकाच्या सुख दुःखात नेहमी सहभागी असतो. त्यामुळे पत्रकारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या आनंदात सहभागी असतो.राज्य मराठी पत्रकार संघ प्रत्येक पत्रकारांच्या पाठीशी कायम उभा राहील.आज आनंदाचा क्षण आहे.आमचा सहकारी मायभूमी न्यूज च कार्यकारी संपादक महेश शिंगोटे यांचा आज वाढदिवस त्यामुळे संघटनेच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा.त्यांनी अशीच रोकठोक निर्भिड पत्रकारिता करत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दयावा.

यावेळी बोलताना पत्रकार महेश शिंगोटे म्हणाले की ,राज्य मराठी पत्रकार संघ राज्यामध्ये सर्वात मोठा संघ असून,अशा संघटने मध्ये मला प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव आरोटे,जिल्हा अध्यक्ष दत्ता पाचपुते,जिल्हा सचिव दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली.तीचे मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही.संघटनेला बळकटी देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत.

  या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव दत्ता गाडगे सर,पारनेर तालुका उपाध्यक्ष व सा . पारनेर समर्थ चे संपादक  सुरेश खोसे पाटील ,सचिव बाबाजी वाघमारे, प्रसिध्दी प्रमुख विजय रासकर,निघोज शहर अध्यक्ष सागर आतकर,पत्रकार आनंदा भूकन,संदीप गाडे,संपत वैरागर व आदींसह राज्य मराठी पत्रकार संघाचे अनेक पत्रकार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्दी प्रमुख विजय रासकर यांनी केले तर, आभार पत्रकार आनंदा भुकन यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments