राजकीय घडमोडींपेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी होत असलेलं काम महत्त्वाचं : विश्वनाथदादा कोरडे

 राजकीय घडमोडींपेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी होत असलेलं काम महत्त्वाचं : विश्वनाथदादा कोरडे


गेल्या नऊ वर्षांतील नरेंद्र मोदी सरकारची कारकीर्द प्रभावी

फोटो - चंद्रकांत कदम


पारनेर : कोण नेता कुठल्या पक्षात गेला, कुणाचा पक्ष फुटला यात सर्वसामान्यांचं वैयक्तिक असं कुठल्याही प्रकारचे नुकसान होतं नसुन केंद्र सरकार अथवा राज्य सरकार मार्फत सर्वसामान्य नागरीकांसाठी होत असलेलं प्रभावशाली काम महत्त्वाचं असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्री विश्वनाथदादा कोरडे यांनी पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.


अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील व विधान परिषदेच्या आमदार सौ.उमाताई खापरे यांच्या विशेष सहकार्यातुन संबंधित काम मंजुर करण्यात आल्याचे श्री.कोरडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून यावेळी सांगितले. या कामाचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते तर श्री राहुल पाटील शिंदे (मा.सदस्य जल व्यवस्थापन समिती), श्री सचिन पाटील वराळ (अध्यक्ष श्री संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन), श्री वसंत दादा चेडे (मा.तालुकाध्यक्ष भाजपा पारनेर), श्री सुभाष दुधाडे (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अ.नगर), श्री शिवाजी खिलारी (मा.सरपंच टाकळी ढोकेश्वर), श्री कृष्णाजी बडवे (मा.तालुकाध्यक्ष भाजपा पारनेर), श्री नवनाथ सालके (उपाध्यक्ष भाजपा पारनेर), श्री संदीप पाटील सालके (सदस्य ग्रा. प.जवळे), श्री अक्षय गोरडे (सामाजिक कार्यकर्ते ), श्री सुरेश काळे (सरपंच), श्री भाऊसाहेब पानमंद(उपसरपंच), श्री भानुदास साळवे (सामाजिक कार्यकर्ते), श्रीमती सीताबाई कदम, अभिमन्यु थोरात, आबा शेळके, मीनाक्षी थोरात, हिरामण थोरात यांसह विविध मान्यवर व स्थानिक ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.


यावेळी श्री काशिनाथ दाते सर यांनी आपण अद्याप भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केलेला नसुन पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षातील नेत्यांनी स्वीकारलेले धोरण न पटल्याने आपण खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या गटात पारनेर भाजपाच्या नेत्यांसोबत सहभागी झालो असल्याचे सांगत आपली भुमिका स्पष्ट केली. पारनेर भाजपाच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या कामांत आपलं कुठल्याही प्रकारचे योगदान नसतानाही टाकळी ढोकेश्वर, सारोळा अडवाई आणि पिंपरी जलसेन इत्यादी ठिकाणी सुरू झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पारनेर भाजपाच्या नेत्यांनी आपणास निमंत्रित केले, ह्या कामांचे उद्घाटन करण्याचा बहुमान दिला त्याबद्दल त्यांनी विश्वनाथ कोरडेंसह सर्वांचेच आभार मानले. आपण आपल्या राजकीय कारकीर्दीत नेहमी ज्या ठिकाणी राहीलो त्या ठिकाणी प्रामाणिकच राहीलो असल्याचे सुचक विधान त्यांनी यावेळी केले. तर राहुल पाटील शिंदे यांनी विश्वनाथदादा कोरडे हे प्रशासकीय काम करण्यात अत्यंत हुशार असे नेतृत्व असुन कुठल्या कामासाठी नेमका कुठुन आणि कसा निधी आणायचा, कुठल्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायचं याचं अचुक ज्ञान त्यांना असल्यानेच एकट्या कान्हुर पठार जिल्हा परीषद गटात डॉ सुजय विखे पाटील व विधानपरिषदेच्या आमदार सौ.उमाताई खापरे यांच्या माध्यमातून त्यांनी विस कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकासकामे मार्गी लावली असल्याचे सांगितले.


आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना श्री कोरडे यांनी सांगितले की, देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी ते स्वतः पंतप्रधान असताना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ केंद्रातुन देण्यात येणाऱ्या एक रुपया पैकी अवघे पंधरा पैसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहचत असल्याची खंत जाहीर भाषणात व्यक्त केलेली होती. परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळात एक पैशाचीही गळती न होता संबंध एकच्या एक रूपया डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतो आहे. केंद्र सरकारची पी.एम.कीसान योजना, राष्ट्रीय पेयजल योजना यांसारख्या सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणाऱ्या विविध योजना. केंद्र सरकार मार्फत प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांसारख्या राज्याला वरदान ठरत असलेल्या विविध योजना राज्यसरकार मार्फत राबविल्या जात आहेत. तरीही सरकारबद्दल हा पक्ष फोडला, तो नेता त्या पक्षात गेला अशा प्रकारच्या वावड्या उठवत विरोधकांकडून नकारात्मकता पसरविण्याचे काम सुरू असुन कुणाचा पक्ष फुटल्याने, कुठल्या नेत्याच्या पक्षांतराने सर्वसामान्य नागरिकांच्या जिवनात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांद्वारे, सोशल मीडियाच्या विविध साईडवरुन होत असलेल्या चर्चांकडे नागरीकांनी लक्ष न देता काम करणाऱ्या माणसांना बळ देण्याचे काम केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी उपस्थित नागरिकांना ह्यावेळी केले.


आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रशासकीय पदं नसतानाही पारनेर तालुक्यात पक्ष संघटना व सरकारमध्ये सहभागी असलेल्या विविध सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असुन पिंपरी जलसेन येथे भागचंद सोनवणे घर ते रोकडोबा मंदिर रस्ता हे १५ लक्ष रूपयांचे काम हा त्यातीलच एक भाग असुन संबंधित काम सुरू असतानाच नागरीकांनी लक्ष घालून ते व्यवस्थितपणे करून घेणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब पानमंद यांनी केले तर आभार श्री. भानुदास साळवे यांनी मानले. यावेळी श्री विश्वनाथ दादा कोरडे मित्र मंडळाच्या वतीने पिंपरी जलसेन गावातील नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत व आभा कार्ड वितरण कॅम्पचे आयोजनही करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments